आज आपल्या सर्वांना सचिनरूपी एव्हरेस्ट दिसतो. पण, तो पर्वत असताना त्याला सर्वात आधी ओळखला तो त्याच्या भावाने अजित तेंडुलकरने! आपल्या छोट्या भावात काहीतरी वेगळं आहे आणि त्याला योग्य आकार दिला पाहिजे, या एकाच ध्येयाने अजित झपाटला आणि त्यामुळे सचिन घडला... त्या अजितच्या शब्दात सचिनचे रेखाटलेले हे अफलातून चित्र!
.................
नितीन, सविता आणि मी, आमच्यापेक्षा सचिनचं बालपण वेगळ्या वातावरणात गेलं. सचिन आणि माझ्यामध्ये जवळजवळ अकरा वर्षांचं अंतर. मला वाटतं आमच्या वयातल्या या अंतरामुळे बराच फरक पडला. सचिन जेव्हा छोटुला होता, तेव्हा मी आणि नितीन दोघंही अक्षरक्ष: क्रिकेटवेडे होतो. काही काळाने मी शाळेसाठी क्रिकेट खेळू लागलो, मग कॉलेजसाठी अन् त्यानंतर इतर अनेक क्लबसाठी. सामन्यांसाठी क्रिकेटचं किट घेऊन घराबाहेर पडताना तो मला पाहायचा. खेळाविषयीच्या ताज्या घडमोडींवर होणाऱ्या आमच्या चर्चाही तो ऐकायचा. बहुधा, याचाच परिणाम म्हणून त्याच्यातल्या खेळाविषयीच्या जाणीवा अगदी लहानपणापासून जाग्या झाल्या.
'साहित्य सहवास' चं मैदान तसं बऱ्यापैकी मोठं. साधारण तीस यार्डाचं. मुंबईमध्ये ही तशी नवलाईच. हे बऱ्यापैकी मोठं मैदानच आमच्या सोसायटीतल्या तरूण पिढीला खेळण्यासाठी प्रवृत्त करायचं, जणू आमंत्रणचं द्यायचं. सोसायटीतल्या अकरा इमारती मिळून दोन संघ सहज तयार होऊ शकतील, इतकी निरनिराळ्या वयाची मुलं सोसायटीत होती.
लहान मुलं सायकल दौडवण्यात, भोवरे खेळण्यात, गोट्या खेळण्यात अन् पतंग उडवण्यात मग्न असायची. सचिन तर नेहमीच त्यात व्यग्र राहायचा... सचिन तसा तुडतुड्या. सतत काहीतरी करायचा. एका जागी बसून राहणं जणू त्याला मान्यच नव्हतं. अवतीभवती त्याची धावपळ सुरू असायची. साहजिकच, मैदानी खेळाबद्दलचा त्याचा रस वाढत राहिला. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये दुपारच्या वेळी त्याचे दोस्त आपापल्या घरी परतायचे. कधी कॉमिक्स वाचायला, तर कधी पत्ते किंवा स्क्रॅकबल खेळायला. पण, सचिन मात्र घरी न येता खाली मैदानावरच काय मिळेल ते खेळत रेंगाळायचा.
त्याला घरी एका जागी बांधून टाकायची ती फक्त एकच गोष्ट टीव्ही! टीव्हीवर विविध खेळाचं प्रसारण सुरू असलं की मात्र तो खिळून राहायचा. १९८१ साली बियॉ बोर्ग व जॉन मॅकेन्रो यांच्यात विम्बल्डनची लढत त्याने अक्षरक्ष: डोळा लावून पाहिली. आम्हा साऱ्यांना बोर्गने विजेता ठरलेलं पाहायचं होतं. पण, सचिनचा मात्र अगदी मनापासून पाठिंबा होता तो मॅकन्रोला! प्रत्यक्षात जेव्हा मॅकेन्रो जिंकला तेव्हा सचिनच्या आनंदाला पारावार राहिलेला नव्हता. त्या क्षणीच तो त्या तरूण अमेरिकन स्टारचा फॅन झाला. मॅकेन्रोचा सचिनवरचा प्रभाव इतका मोठा होता की त्याने एकदा टेनिस रॅकेटची, एका हेड बँडची अन दोन रिस्ट बँडची मागणी केली. त्याला त्याच्या हिरोसारखं दिसायचं होतं. सोसायटीतल्या मैदानाभोवती काँक्रिट रस्त्यावर सचिन मॅकेन्रोची नक्कल करायचा. सचिनच्या कुरळ्या केसांमुळे तो मॅकेन्रोची छोटी मूतीर्च वाटायचा. त्याचे मित्र त्याला 'मॅक' म्हणायचे.
मला वाटतं, मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाचं टीव्हीवर होणारं प्रसारणच आम्ही खेळाकडे आकषिर्त होण्यासाठी महत्त्वाचं ठरलं. त्यातच भरच पडली ती आमच्या सोसायटी डेच्या दिवशी होणाऱ्या स्पर्धांमुळे. क्रिकेटचा सामना व्हायचा, सायकल शर्यत, शंभर मीटर धावण्याची शर्यत, लांब उडी, गोळाफेक सारं काही त्या दिवशी व्हायचं.
आम्हा मोठ्या मुलांकडे पाहून मग छोट्यांनीही संघ तयार केले. आम्ही मैदानावर खेळत असून तर ती मुलं मैदानाभोवतीच्या काँक्रिट रस्त्यावर खेळायची. कधी गॅरेजमध्ये, तर कधी इमारतींच्या गच्चीवर खेळायची. मंंुबईमध्ये असणाऱ्या क्रिकेटच्या वातावरणाचं हे प्रतिबिंब होतं.
'साहित्य सहवास'मधल्या काही छोट्यांची प्रगती तर त्यांना आम्हा मोठ्या मुलांच्या संघात सामावून गेली. त्यापैकीच सचिन एक होता! आमच्या बरोबरीने खेळायची संधी मिळाल्यामुळे तो कमालीचा खूश होऊन गेला. मोठ्या मुलांमध्ये शांत अन् लाजराबुजरा असायचा, घरी आला की मात्र मोठ्या आत्मविश्वासाने बोलायचा. अशावेळी काल परवाचा लहानसा, अंगठा चोखत, केसातून हात फिरवत (लहानपणीची सवय) आम्हा भावंडाच्या किक्रेटवरील चर्चा ऐकत राहणारा हाच का तो सचिन, असा प्रश्ान् आम्हाला पडत असे... त्याच्यात झालेला बदल आश्वर्यकारक होता. त्याची वाढत जाणारी प्रगल्भता अन् खेळाची त्याची समज यामुळे आमच्या अन् त्याच्या दरम्यान असलेला फरक आम्ही विसरून गेलोे. त्याचा खेळ आम्ही अधिक उत्कंठतेने पाहू लागलो. स्पर्धात्मक क्रिकेट खेळल्यामुळे माझ्या गाठीशी थोडाफार अनुभव होतो. शिवाय, आमच्या घरामध्ये मीच वयाने त्याच्या सर्वात जास्त जवळचा होतो. क्रिकेटचा खेळ अधिक जाणून घेण्यासाठी, फलंदाजी आणि गोलंदाजीच्या अनुषंगाने काही सल्लामसलत करण्यासाठी साहजिकच मग तो माझ्यावर अवलंबून राहू लागला.
याच काळात माझ्या छोट्या भावामध्ये काहीतरी आगळं असं कौशल्य असल्याची मला जाणीव झाली. इतर खेळातल्या आपल्या हिरोंची नक्कल सचिन करत हाता हे खरं. पण त्याचे जे क्रिकेटपटू हिरो होते त्यांची नक्कल करताना मात्र तो कधीच दिसला नाही. फलंदाजी असो वा गोलंदाजी, त्याची स्वत:ची अशी शैली होती. फटके खेळताना तो कधी कचरला नाही. फलंदाजी करताना त्याचे हात विलक्षण सफाईने फिरायचे. खेळ जणू त्याच्या रक्तातच होता, अन् चेंडूचा टप्पा जोखणारा त्याचा अंदाज केवळ वाखण्याजोगा! सचिनच्या शरीराच्या हालचाली, त्याच्यात एक नैसगिर्क खेळाडू दडलेला असण्याचा पुरावा त्याचा खेळ पाहणाऱ्याला देत होत्या.
मी अनेकदा त्याचा खेळ निरखून पाहिला. आणि प्रत्येक वेळी आपण एका खऱ्याखुऱ्या क्रिकेटपटूला पाहत असल्याचंच मला जाणवलं. सचिनच्या ठायी असलेली ही गुणवत्ता वाया जाऊ देता कामा नये, असंच माझ्या मनाने घेतलं.
(अक्षर प्रकाशनच्या 'असा घडला सचिन तेंडुलकर' या पुस्तकावरून साभार)
Saturday, November 14, 2009
भेट तुझी माझी स्मरते!--अंजलि तेंदुलकर
सचिन व माझी पहिली भेट झाली ती मुंबई विमानतळावर! १९९०ची ही गोष्ट... भारतीय संघाचे इंग्लंड दौऱ्याहून मायदेशी आगमन झालं होतं. माझ्या आईला आणायला मी विमानतळावर गेले होते. कसोटीतील पहिलंवहिलं शतक झळकावल्यानं सचिनसाठी तो दौरा स्पेशल ठरला होता. त्यावेळी त्याला पहिल्यांदाच पाहिलं... क्रिकेटमध्ये रुची नसल्यानं मी त्याला ओळखलंच नाही. त्यानंतर मित्र, मैत्रिणींद्वारे भेटी झाल्या अन् पाच वर्षांच्या मैत्रीनंतर १९९४मध्ये न्यूझीलंडला साखरपुडा झाला, तर १९९५मध्ये आमचे शुभमंगल झाले! क्रिकेटच्या अज्ञानामुळे मी त्याला ओळखलं नव्हतं. मैत्री झाली तेव्हादेखील माझ्यासाठी तो फक्त सचिन तेंडुलकर होता. लग्नानंतर क्रिकेटचा अभ्यास केला. आज फिल्डिंग पोझिशनपासून क्रिकेटच्या प्रत्येक गोष्टी मला माहिती आहेत; पण घरी असल्यावर सचिनला क्रिकेटवर चर्चा करायला आवडत नाही. कधीकधी दुखापतींमुळे किंवा मनाजोगी कामगिरी न झाल्याने तो निराश होतो, त्यावेळी क्रिकेटविषयी बोलणं होतं.
सचिनच्या लोकप्रियतेमुळे कुठे बाहेर जायचे म्हणजे थोडे दडपण येते. याबाबतचा एक किस्सा तर धमाल आहे... माझ्या मित्र, मैत्रिणींनी 'रोजा' सिनेमाला जायची योजना आखली होती. तो नाहीच म्हणत होता; पण मी सचिनला आग्रह केला. त्याला कुणी ओळखू नये म्हणून खोटी दाढी लावली, एक चष्माही दिला. सिनेमाला थोडं उशीराच गेलो. सगळं व्यवस्थित झालं; पण मध्यंतराला चष्मा पडल्यानं लोकांनी त्याला ओळखलं. त्यानंतर त्याची व आमची जी तारांबळ उडाली त्याचं शब्दात वर्णन करणं कठीणच! 'रोजा'चा उतरार्ध आम्ही पाहिलाच नाही.
सचिनची 'बेटरहाफ' झाल्यावर डॉक्टरकी सोडली. तो निर्णय स्वखुषीने घेतल्याने त्याबद्दल पश्चात्ताप नाही. सचिन बऱ्याच गोष्टींसाठी माझ्यावर अवलंबून असल्यानं डॉक्टरकी करणं शक्य नव्हतं. प्रत्येक गोष्ट त्याच्या हाती मिळावी, त्याला कोणतीही कमतरता जाणवू नये म्हणून घरीच राहण्याचा निर्णय घेतला. लहानपणी मोठा भाऊ अजितने सचिनसाठी अनेक गोष्टींचा त्याग केला. लग्नानंतर ९ ते ५ नोकरी करण्याऐवजी अजितप्रमाणे सचिनसाठी उपलब्ध असण्याचा निर्णय घेतला.
रविवारी तो आंतरराष्ट्रीय कारकिदीर्ला २० वषेर् पूर्ण करतोय, पण आजही तो फलंदाजीला आला की मी अस्वस्थ होते. खूप दडपण येतं, म्हणून त्यावेळी फोन घेत नाही. घरातील एका विशिष्ट जागेवर बसून मी त्याची फलंदाजी पाहते. ती जागा लकी आहे असे वाटते. त्यावेळी हात आपसूक जोडले जातात. टीव्ही व गणपती बाप्पाच्या फोटोवर माझी नजर असते. त्यादिवशी मी काहीच खात नाही. गेली १९ वषेर् त्याला ओळखतेय. आधी त्याची खास मैत्रीण होते अन् आता पत्नी. त्यामुळे या दडपणाची सवय झालीय. मीच काय पण आमची दोन मुलं व पूर्ण कुटुंबाला या साऱ्या गोष्टीची सवय झालीय...

सचिनमुळे आपण एकत्र येतो!--दिलीप प्रभावलकर
आजचं बदललेलं क्रिकेट मला आवडत नाही. मूळचा मी क्रिकेटचा चाहता, पण आज या खेळाला इव्हेण्टचं जे स्वरूप आलंय त्याने माझ्या मनात क्रिकेटविषयी दुरावा निर्माण झालाय. एखाद्या कुशल खानसाम्याला फूडमॉलमध्ये काम करायला लावण्यासारखं वाटतं मला हे. पण सचिन खेळायला आला की माझ्या मनात निर्माण झालेली ही अढी क्षणात दूर होते आणि जुनं प्रेम उफाळून येतं. सचिनमुळेच मी क्रिकेटकडे पुन्हा ओढला जातो.
चोवीस वर्षांपूवीर् मी आणि सुरेश खरेंनी एक व्हिडिओ प्रॉडक्शन युनिट काढलं होतं. सुरुवातीच्या काळात आम्हाला खेळांवरच्या शैक्षणिक व्हिडिओ फिल्म्स बनवायचं काम मिळालं होतं. 'हाउ टू प्ले क्रिकेट' अशी एक फिल्म बनवायची होती. क्रिकेटचा श्ाीगणेशा करणाऱ्यांसाठी बेसिक माहिती द्यायची होती. म्हणजे, अमूक स्ट्रोक कसा मारतात, हूक कसा करावा, एलबीडब्ल्यू कसा ठरतो वगैरे. याचं प्रात्यक्षिक दाखवायला आम्हाला काही ज्युनियर खेळाडू हवे होते. मी शारदाश्ाम कॉलनीत राहायचो. समोरच शारदाश्ाम शाळा होती. तिथे जाऊन मी रमाकांत आचरेकर सरांना भेटलो. त्यांनी मला शिवाजी पार्कवर बोलवलं तिथे मी गेलो तेव्हा आचरेकर सर स्वत: मैदानाला पाइपाने पाणी घालत होते. आमच्या बरोबर दिग्दर्शक विनायक चासकरही होते. मुलांनी आम्हाला प्रात्यक्षिकं दाखवली. त्यांच्यात बारा-साडेबारा वर्षांचा सचिन तेंडुलकर होता. अगदी बारीक आणि कुरळ्या केसांचा. त्याच दिवसांत सचिन आणि विनोद कांबळीने हॅरिस शील्डला पार्टनरशिपचे र्वल्डरेकॉर्ड केले होते, त्यामुळे रेकॉर्ड करणारी पोरं म्हणून आम्हाला त्यांची नावं माहीत होती. मला आठवतंय, तेव्हा आचरेकर सर आमच्याशी बोलताना म्हणाले होते, 'हा कांबळी टॅलेंटेड आहे पण अधिक स्टायलिश आहे. सिलेक्टर्सवर इम्प्रेशन मारायला बघतो. टेक्निकली तेंडल्या जास्त पफेर्क्ट आहे.'
त्यानंतर माहीमच्या मुघल लेनमध्ये आमच्या एडिटिंग ऑफिसमध्ये आम्ही फिल्म एडिट करायला बसलो होतो तेव्हा ही सगळी मुलं आपण टीव्हीवर कसे दिसतो, हे बघायला आली होती. त्यात सचिन, विनोद, मयूर कदेकर आणि बरीच गुणी मुलं होती. त्यांच्यातला खुचीर्वर बसून गुडघ्यावर कोपर ठेवून हाताच्या तळव्यावर हनुवटी तोलून एकटक फिल्म बघत बसलेल्या सचिनची मुदा मला अजून आठवते.
तो शारदाश्ाम विद्यालयाचा आणि माझीही शाळा तीच. त्यामुळे मला त्याचा अभिमान आहेच, त्याच्यामुळे आमच्या शाळेचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलं याचा मला खूप आनंद होतो.
वीस वर्षं सचिन क्रिकेट खेळतोय. आजच्या कटथ्रोट कॉम्पिटीशनच्या काळात एवढा काळ खेळत राहून ११ जणांच्या टीममध्ये आपलं स्थान टिकवायचं आणि सर्वमान्य व्हायचं, ही गोष्ट सोपी नाही. जिनीअस खेळाडू अजातशत्रू असतातच असं नाही, पण तो तसा आहे. विजय मर्चंट क्रिकेटला 'जटलमन्स गेम' म्हणायचे, तो सचिन खेळतो. त्याच्या अवतीभोवती सटकू, मानभावी, आत्मकेंदित नाठाळ क्रिकेटपटू भरपूर आहेत. पण त्यांच्याही मते सचिन हा जंटलमन आहे. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी लव्हेबल निरागस भाव असतात.
सचिनचं अपिल हे भाषा, प्रांत, धर्म यांच्या पलिकडे आहे. 'लाइकिंग तेंडुलकर' ही वेगळीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपापलं वेगळेपण जपणारे आपण एकत्र येतो, ही त्याची मोठी अचिव्हमेंट आहे.

सर्वोत्तम फलंदाज आणि माणूसही---महेश मांजरेकर
सचिन केवळ फलंदाज म्हणूनच नाही तर माणूस म्हणूनही खूप मोठा आहे. अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून त्याचा हे ग्रेटनेस दिसतो. मी स्वत: त्याचा अनुभव घेतलाय. १९९६ मध्ये आम्ही इंग्रजी 'ऑल द बेस्ट' करत होतो. सोफायामधल्या प्रयोगाला सचिन येणार होता. पण तो येणार म्हणजे सगळं पब्लिक नाटक सोडून त्याला बघणार हे उघड होतं. सचिननेही ते ओळखलं. नाटकाची तिसरी घंटा होईपर्यंत तो थिएटरबाहेर थांबला. तो आलाय हे मध्यंतरापर्यंत त्याने कोणाला कळूच दिलं नाही. हे फक्त तोच करू शकतो. मध्यंतराच्या वेळी तो बॅकस्टेजला आला. अतुल काळे, सतीश राजवाडे, सुनील बवेर् या कलाकारांना भेटला. कलाकारांनी केलेल्या कामाचं त्याने भरभरून कौतुक केलं. त्याचं वावरणं इतकं स्वाभाविक होतं की आम्ही सगळेच खूप प्रभावित झालो. पुढे एका चॅरिटी मॅचमध्ये मला सचिनच्या टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली. सचिन इलेव्हन विरुद्ध हृतिक इलेव्हन असा सामना वानखेडे स्टेडीयमवर रंगला होता. सचिनने मला विचारलं बॉलिंग टाकशील का? मी हो म्हटलं. एक ओव्हर टाकली. आमची बॅटिंग आली तेव्हा मला लवकर बॅटिंग मिळण्याची आशा नव्हती. कारण माझं तेव्हा फारसं नाव नव्हतं. सचिन सोबत अनिल कपूर ओपनर म्हणून क्रिजवर जाणार होते. मी सचिनला म्हटलं की माझ्या एका फिल्मची ट्रायल आहे मला लवकर जायचंय. सचिन पॅड उतरवू लागला तो म्हणाला तू ओपनर जा! मी ओशाळलो नी त्याला म्हणालो, मी वन डाऊन जातो. अनिल लवकर आऊट होणार याबाबत मला अजिबात शंका नव्हती. माझा विश्वास खरा ठरला. अनिल दुसऱ्या ओव्हरला आउट झाला. लोच्या झाला, अजित आगरकरने पॅड बांधायला घेतले. पण सचिनने त्याला सांगितलं महेशला जाऊ दे! मला भरून पावलं. मी ठरवलं आता आऊट व्हायचं नाही. आम्ही दोघांनी १२० ची पार्टनरशिप केली. सचिनने ८२ धावा केल्या मी ५२. दोघांचं अर्धशतक झालं. समोर कपिल, अक्षयकुमार सारखे गोलंदाज असून आम्ही दोघे नॉट आऊट राहिलो. इतरांना बॅटिंग मिळावी म्हणून रिटायर्ड झालो. ही मॅच आम्ही जिंकली. खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये मी माझ्या आयुष्यातले सर्वाधिक आनंददायी क्षण अनुभवले. खेळताना एकदा सचिनने स्ट्रेट ड्राइव्ह मारला. बॉल माझ्या मांडीवर आदळला. यात सचिनची काहीही चूक नसताना तो मला अनेकदा 'सॉरी' म्हणाला. या बॉलने माझ्या मांडीला झालेली दुखापत मी अनेक दिवस फार प्रेमाने जपली. एका महान फलंदाजाने हाणलेल्या चेंडूची ती आठवण होती. अशा अनेक आठवणी आहेत. तो जगातला सवोर्त्कृष्ठ फलंदाज आहे आणि सवोर्त्तम माणूसही...
आजही नम्र, निरागस----- गौतम राजाध्यक्ष, फोटोग्राफर
सचिनचे फोटो पहिल्यांदा काढले ते षट्कार पाक्षिकासाठी. १९९३-९४ च्या सुमारास. सोबत संजय मांजरेकरही होता. तेव्हा कुरळ्या-कुरळ्या केसांचा अबोल, निरागस, गोड सचिन आणि धीट संजय या दोघांच्या व्यक्तिमत्त्वामधला फरक ठळकपणे जाणवला. सचिन आजही तस्साच आहे. दरम्यानच्या काळात एका सोसायटी मॅगझिनसाठी, नंतर अजित तेंडुलकरने लिहिलेल्या 'असा घडला सचिन' पुस्तकाच्या कव्हरसाठी आणि तीन वर्षांपूवीर् माझ्या लेखासाठी त्याचे फोटो काढले. त्या प्रत्येकवेळी त्याच्या चेहऱ्यावरचा कोवळा, निरागस भाव कायम होता. तो हसला की एक हजार वॉटचा बल्ब लावल्यासारखे वाटते. त्यामुळे एवढ्या वर्षांत उन्हात खेळून त्याच्या चेहऱ्यावर एखादी सुरकुती आलीही असेल, पण तो हसला की लहानगा सचिनच वाटतो. अजित त्याला फोटोसाठी घेऊन आला होता, तेव्हा त्याच्या सर्व सूचना सचिन निमूटपणे ऐकत होता. फोटोसाठी मी सांगेन तसे करण्याचा प्रयत्न करत होता. आजही तो तेवढाच आज्ञाधारक आहे. आजही कॅमेऱ्याला तो धीटपणे फेस करू शकत नाही, तो बावरतो. मी त्याला तसे सांगितल्यावर त्याने ते लगेच मान्य केले. जाहिराती, शुटींग ही माझी क्षेत्रे नाहीत, क्रिकेट हे माझे क्षेत्र आहे, असे त्याने नम्रपणे सांगितले. अर्जुनाला जसा केवळ माशाचा डोळा दिसत होता, तसे क्रिकेट हे त्याचे एकमेव लक्ष्य आहे. त्यामुळेच तो एवढी मोठी मजल मारू शकला.
एखाद्या समारंभात तो आला की आवर्जून भेटतो, नमस्कार करतो, नम्रपणे बोलतो. मला त्याने कशाला एवढे महत्त्व द्यायचे? त्याने ओळख दाखवली नाही तरी त्याची गुणवत्ता कमी होणार नाही. पण ग्रेट माणसांमध्ये इथेच फरक असतो. सचिनसारखी ग्रेट माणसे यशानंतर, अनुभवानंतर अधिक नम्र होत जातात.

सच्चा मित्र!--- अजित आगरकर
आंतराष्ट्रीय कारकिदीर्ची वीस वर्षे... खरंच या पठ्ठ्याचे कौतुक करावं तितकं थोडंच. गेली अनेक वर्ष मी सचिनबरोबर खेळतोय, त्याचा खेळ जवळून पाहण्याची संधी मिळाली. अनेक यादगार खेळी तो खेळलाय. खरंतर मला आवडणारी त्याची एखादी खेळी सांगणं कठीणच! तरीही माझ्या डोळ्यासमोर येते ती शारजामधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची १४३ धावांची वादळी खेळी. खरं, सांगू त्यावेळी मी संघात असूनही त्याचा खेळ पाहिला नव्हता. पॅव्हेलियनमध्ये बसून सचिन असाच खेळत राहो, अशी प्रार्थना करत होतो. आमचा फायनलमधील प्रवेश त्या सामन्यातील नेट रनरेटवर ठरणार होता. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढले होते. सचिनच्या अफलातून खेळीने संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. नंतर हायलाईट्समध्ये तो सामना पाहताना सचिनची फलंदाजी मनसोक्त पाहिली. पाच षटकार, नऊ चौकारांसह त्याने १३१ चेंडूत १४३ धावा चोपून काढल्या होत्या. शारजातील त्या खेळीतील प्रत्येक फटका आजही डोळ्यासमोर येतो.
कटू प्रसंगांना तोंड देताना मित्र व संघसहकारी म्हणून सचिन सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. मुंबई संघात पदार्पण केलं तेव्हा संजय मांजरेकर व सचिननेच प्रोत्साहन दिले. त्यामुळे फारसं दडपण आलं नाही. भारतीय संघात माझी निवड झाल्याची बातमी ऐकल्यावर खूप आनंद झाला होता, पण दडपणही आले. खूप अस्वस्थ होतो, चांगली कामगिरी होईल का, हेच विचार सतत मनात येत होते. त्यावेळी सचिनने एक मार्गदर्शक व मित्र म्हणून खांद्यावर हात ठेवून समजावले, अन् मनातली भिती कुठे पळून गेली ते कळलंच नाही.
कठीण प्रसंगात मित्र म्हणून त्याचा जसा पाठिंबा लाभला, तसंच त्याच्या असण्याने ड्रेसिंगरुमचे वातावरण खुलते. समोरचा माणूस दुखावणार नाही, हे लक्षात ठेवून तो छान गंमती-जमती करतो. ज्या खेळाडूंसह त्याने मुंबईचे प्रतिनिधित्व केले, असे त्याच्या पिढीतील फारसे खेळाडू आताच्या संघात नाहीत. नवे चेहरे संघात सामील झालेत. त्यामुळे सचिन मुंबईच्या ड्रेसिंगरुमध्ये असतो, तेव्हा ही सारी नवी पोरं र्नव्हस होतात, पण मनमोकळा स्वभाव व खिलाडूवृत्तीने सचिन ज्युनियर-सीनियर हे अंतर कधी कमी करतो, तेच कळत नाही. हा माणूस म्हणजे जणू सद्गुणांची खाणच! प्रत्येक खेळाडूचा एक आवडता फटका असतो सचिन मात्र प्रत्येक फटका लीलया खेळतो. कार, वॉचेस, म्युझिक त्याला प्रचंड आवडतं, सध्या आयपॉड वैगरेअसल्याने सीडीज, कॅसेट्स घेऊन जाण्याची तारेवरची कसरत त्याला करावी लागत नाही.
गेल्या वीस वर्षांत सचिनच्या स्वभावात बदल झालेला नाही. माणुसकी तो जपतो. तो असाच अनेक वर्ष खेळत राहो, त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ असाच सुरू राहो... सचिनला माझ्या मनापासून शुभेच्छा.

मोठा माणूस--राज ठाकरे
शिवाजी पार्कमधील आम्ही सगळे 'अंडरआर्म'वाले... जोरजोरात बॉल टाकणारे. मीही त्यावेळी जोरात बॉल टाकायचो. एकदा आम्ही एमआयजी क्लबवर सचिनसोबत 'अंडरआर्म'ची मॅच घेतली. सचिन टूरवर जाण्याआधी आमची मॅच होती. आधीच रबरी बॉल, त्यात विकेट ओलसर असल्याने तो तुफान वेगात जायचा. अतुल रानडे, सुनील हषेर् अशी सगळी आमची टीम होती. सचिनने त्यावेळी तुफान बॅटिंग केली... दोन-तीन रबरी बॉल फोडूनही टाकले. माझ्या बोलिंगवरही त्याने फोर-सिक्स मारले. माझी बोलिंग त्याने चांगलीच झोडपली तरीही सचिनच्या फोर-सिक्सचेच मला अधिक कौतुक होते.
मॅच संपवून आम्ही नेटबाहेर बसलो होतो. रात्री मी आणि सचिन जेवायला जाणार होतो. आम्ही तसे बऱ्याचदा जेवायला भेटतो. मात्र त्यादिवशी सचिन म्हणाला, 'माझा हात खूप दुखतोय, आजचे रात्रीचे जेवण आपण कॅन्सल करूया. हाताचे दुखणे सहन होत नसल्याने रात्रीचे जेवण आपण एकत्र घेणे मला जमणार नाही.' तो दिवस सचिनच्या 'टेनिस एल्बो'चा होता. पुढे सचिनचा हात फारच दुखायला लागला आणि त्याला 'टेनिस एल्बो'ची शस्त्रक्रिया करावी लागली. यात जवळपास महिना गेला. ऑपरेशन झाले लंडनमध्ये. हॉस्पिटलमधून ज्या दिवशी सचिनला डिस्चार्ज मिळाला तेव्हा योगायोगाने त्यादिवशी मीही लंडनमध्ये होतो. त्यामुळे आमच्या जेवणाचा बेत त्यादिवशी लंडनमध्ये पार पडला. ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे ब्रम्हदेशाचे फूड फार छान मिळते. जेवताना त्याने मला त्याच्यावरील ऑपरेशनबाबत सगळी बारिकसारिक माहिती सांगितली।
लतादिदी असो की सचिन तेंडुलकर, ही माणसे कोणताही पुरस्कार मिळण्याआधीच मोठी झाली आहेत. त्यांचे कर्तृत्व हे त्यांना मिळणाऱ्या पुरस्कारापेक्षा मोठे आहे. सचिनला अजून 'भारतरत्न' मिळाला नसला तरी त्याने क्रीडाक्षेत्रात भारतला जो बहुमान दिला आहे त्याच्या जोरावर सर्वसामान्यांच्या मनात तो 'भारतरत्ना'सारखाच आहे. त्याची इतर कोणत्या खेळाडूशी तुलना करायची म्हटले तरी मला ती करता येणार नाही. सर्वच बाबतीत तो सर्वांच्या पुढे आहे.
सचिनमध्ये बरेच गुण आहेत, मात्र कोणत्याही गोष्टीच्या खोलात जाणे हा त्याचा गुण मला सर्वाधिक मोठा वाटतो. घड्याळ असो की कार, ऑडिओ सिस्टिम असो की एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू. तो त्या वस्तूच्या खोलात जातो. त्या वस्तूमध्ये नेमके कोणते पार्टस् आहेत, त्यांचे नेमके कार्य काय याची तो सखोल माहिती करून घेतो आणि समोरच्याला ती देतोही.
सचिनच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मी त्याला सर्वप्रथम भेटलो. त्यानंतर आजतागायत आम्ही भेटतच आलो आहोत आणि आमच्यात चांगलेच मैत्रीसंबंध आहेत. मुंबईतील त्याच्या मॅचेस मी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. एरवी त्या मी टीव्हीवरच बघतो. अत्यंत सरळ, मनमिळावू, विनम्र असा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे सहसा त्याच्या नावाला वादविवाद कधी चिकटत नाहीत. त्याच्यावर कधी तोंड उघडण्याची वेळ येत नाही. तो जे बोलतो ते त्याच्या बॅटनेच. तो जेव्हा बॅटिंगला उतरतो आणि तुफान फटकेबाजी करतो तेव्हा माझा काय किंवा प्रत्येकाचाच मूड पालटतो.

Subscribe to:
Posts (Atom)