वानखेडेवर सचिनला भेटण्याचा अनेकदा योग आला। तो जेवढा ग्रेट खेळाडू आहे तितकाच माणूस म्हणूनही तो मोठा आहे। मैदानावरील काम करणाऱ्या माळयांपासून ते इतर कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची तो आस्थेने चौकशी करतो। प्रत्येकाशी त्याचा संवाद असतो. उत्तम पीच बनवल्यानंतर त्याच्याकडून हमखास दाद मिळते. त्यामुळे सर्वांच्या मनात त्याच्याविषयी प्रचंड आदरभाव आहे, वानखेडे स्टेडियमवर गेली २७ वषेर् ग्राऊंड्समनची जबाबदारी सांभाळणारे के। व्ही. तांबे असं सांगतात तेव्हा सचिन ग्रेट असल्याचे लक्षात येते.
प्रॅक्टीस करताना मैदानावर बॉल लागून जखमी झालेल्या माळ्याच्या मदतीसाठी धावून जाणारा... उत्तम पिच बनवल्याबद्दल पाकिटातील सर्व पैसे बनवणाऱ्यांना बक्षीस म्हणून देणारा... मैदानावरील गवत कापण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांपासून ते साफसफाई करणाऱ्यापर्यंत प्रत्येकाची आस्थेने चौकशी करणारा आणि त्यांज्या अडीअडचणीत सहकार्य करणारा... अशा अनेक प्रसंगामुळे क्रिकेट मैदानावरील कर्मचारीही सचिनचे फॅन आहेत. याचा अनुभव केवळ वानखेडे किंवा इडन गार्डन येथेच येत नाही तर क्रिकेट कारकिदीर्त तो ज्या ज्या मैदानावर खेळला तेथील प्रत्येक कर्मचारी त्याज्या प्रेमळ स्वभावाचे दाखले देताना जराही थकत नाहीत. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि सचिनचे असेच प्रेमळ नाते आहे. येथे माळीकाम करणाऱ्या गोविंद पाटील व गणू गौड यांच्यासह सर्वांची त्याचा थेट संवाद होता. दहा वर्षापूवीर् सचिनने दादोजी कोंडदेव स्टेडियमवर एका मदतनिधी सामन्यात केलेली फटक्याची आतषबाजी ठाणेकरांच्या आजही लक्षात आहे. पण त्याचबरोबर सचिन किती थोर आहे, याचा अनुभव आम्हाला मॅचनंतर लगेच आला. मॅच संपल्यानंतर मैदान आणि पिच बनवणाऱ्या सर्वांना एकत्र भेटला. अतिशय चांगले पिच बनवल्याबद्दल त्याने आम्हा सर्वांचे कौतुक केले. त्यानंतर आमच्यापैकी काहींशी तर त्याज्याशी मैत्रीचे नाते निर्माण झाले. जगातील बेस्ट बॅट्समन बनल्यानंतरही त्याच्या मैत्रीत कधी खंड पडला नाही. ठाण्यात कधी आल्यास तो स्टेडियममधील कर्मचाऱ्यांचीही आस्थेने चौकशी करतो, दादोजी कोंदडेव स्टेडियमची जबाबदारी सांभाळणाऱ्यांपैकी एक असलेले हरिश्चंद वाव्हळ सचिनच्या आठवणींमध्ये रमले होते...
एमआयजी क्लब आणि सचिन याचे नातेही अतूट आहे. सचिन एमआयजीवर आल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांचीही आस्थेने चौकशी करतो. त्याज्याकडून होणारे कौतुक सर्वांनाच बळ देऊन जाते. विक्रमाची नवी शिखरे पादक्रांत करतानाही त्याज्या स्वभावात मात्र जराही फरक पडलेला नाही, असे एमआयजीवरील ग्राऊंडसमन लालुसराम जैस्वाल सांगतात. शिवाजी पार्क, आझाद मैदान येथील कर्मचाऱ्यांपैकी अनेकजण आता निवृत्त झाले आहेत. पण सचिन आणि त्यांच्या मैत्रीच्या नात्यात जराही फरक पडलेला नाही.
Wednesday, November 18, 2009
Saturday, November 14, 2009
कादिरला मारलेला तो षटकार!
वयाच्या सोळाव्या वर्षी भारतीय संघात दाखल झालेल्या सचिनने पदार्पणापासूनच आपल्या कामगिरीचा आलेख चढता ठेवला आहे तो जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर! आजही प्रत्येक सामन्यात शतकी खेळीच्या प्रयत्नात असणाऱ्या सचिनची धावांची भूक आजही भागलेली नाही।भारतीय संघ १९८९ मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारतीय संघाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी माझ्याकडे होती आणि सचिनची टीममध्ये एन्ट्री झाली होती...भारतीय संघ सरावासाठी नेटस्मध्ये यायचा, त्यावेळी अवघे साडेसोळा वर्ष वय असणारा हा खेळाडू जीव ओतून खेळायचा... नेटस्मधल्या सरावात फलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणातही तो इतका रमायचा की त्याला तिथून बाहेर काढणे त्यावेळी अवघड होऊन जायचं. मॅच सुरू असताना सलील अंकोलाच्या साथीने ड्रेसिंगरुमच्या मागील बाजूस सचिन सराव करत राहायचा.
याचदरम्यान भारत-पाकिस्तान यांच्यात प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या सामन्यात सचिन होता. पाकिस्तानचा नामवंत लेगस्पिनर अब्दुल कादिर खेळत असल्यामुळे कुठल्याही नवख्या फलंदाजावर दबाव आला असता. पण, सचिन बॅटिंग करण्यासाठी मैदानात गेला आणि कादिर छोटा वाटला! कादिरच्या हातभर वळलेल्या चेंडूवर सचिनने षटकार ठोकत ड्रेसिंगरूमची काच फोडली तेव्हा सर्वांच्या तोंडाचा चंबू झाला होता... आजही माझ्या मनात ही आठवण ताजी आहे.
या दौऱ्यातील सियालकोटच्या कसोटीत सचिनला संघात घेतलं होतं. सियालकोटची विकेट जलदगती गोलंदाजाना अनुकूल अशीच तयार करण्यात आली होती. त्यामुळे पाक संघातल्या इम्रान खान, वकार युनुस, वसिम अक्रम या गोलंदाजाना त्याचा फायदा होणार हे निश्चित होते.
पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या सचिनच्या चेहऱ्यावर मात्र भीतीचा लवलेश दिसला नाही. वकारने टाकलेला पहिलाच बाऊन्सर चेंडू त्याच्या तोंडावर बसला आणि नाकातून रक्त वाहू लागले. फिजीओथेरपिस्टने उपचार केल्यानंतर सचिन पुन्हा मैदानात उतरला. वकारच्या पुढच्या तीनही चेंडूवर सचिनने चौकार लगावले. त्याचवेळी हा खेळाडू भारतीय संघाचा दमदार फलंदाज म्हणून नावारुपाला येईल, अशी माझी खात्री झाली.
२००७ मध्ये भारतीय संघ इंग्लड दौऱ्यावर गेला तेव्हा पुन्हा एकदा मॅनेजरपदाची जबाबदारी माझ्याकडे आली. त्या दौऱ्यातही सचिनने अप्रतिम कामगिरी केली मात्र तीनदा त्याला चुकीच्या पध्दतीने बाद देण्यात आल्यामुळे त्याची तीन शतके हुकली.
सीनियर खेळाडूंबद्दल सचिनच्या मनात अतीव आदर आहे. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत माझ्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गौरवसोहळ्याला तो आवर्जून हजर राहिला... हे मी कधीच विसरणार नाही.

तो कधीच 'आऊट' होणार नाही- विजया राजाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक
सचिनचा जन्म साहित्य सहवासमध्ये झाला. त्यामुळे लहानपणापासूनच आम्ही त्याला पाहतोय. गोरा, गोंडस दिसायचा तो लहानपणी. त्याचे केस कापलेले नसल्यामुळे
मानेपर्यंत रुळणारे त्याचे ते कुरळे केस आणि त्यातून दिसणारा त्याचा इवलासा चेहरा मला अजूनही आठवतो। साहित्य साहित्य सहवासच्या मैदानावर तो क्रिकेट खेळायचा तेव्हा अनेकांच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत। तसा तो व्रात्य होता. पण त्याला ओरडावसं वाटलं नाही कारण तो अतिशय सुसंस्कृत आईवडलांचा मुलगा होता. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर आणि माझी विशेष मैत्री होती. ते गेले, तेव्हा मला मोठा धक्काच बसला होता. त्यांच्या जाण्यानंतर सचिनने केलेली सेंच्युरी मला आजही आठवते.
सचिन त्याच्या व्यग्र शेड्युलमुळे जरी साहित्य सहवासपासून दूर गेला असला तरी जुने मित्र, आप्तस्वकीय यांना त्याने कधीच दूर केले नाही. रोज तो भेटत नसेलही पण त्याने सगळ्यांची ओळख ठेवली हेही काही कमी नाही. सचिन लहान असताना रमेश तेंडुलकर हातात क्रिकेटचं भलं मोठं किट घेऊन शिवाजी पार्कला त्याला घेऊन जायचे तेही अजून स्वच्छ आठवतं. तेव्हा तो कोणी मास्टर ब्लास्टर नव्हता. काचा फोडल्याने लहानपणी तसा त्याने लोकांचा ओरडाही खाल्ला आहे. पण एकंदरच आईवडिलांनी त्याच्यावर जे संस्कार केले त्याला तोड नाही. मुख्य म्हणजे त्या तिनही भावांना अजित, नितीन आणि सचिन या तिघांनाही एकमेकांचं फार कौतुक आहे.
सचिनच्या पाठीशी आधी वडील खंबीरपणे उभे होते आणि मग त्याचे भाऊ. त्या सगळ्यांनी मिळून त्याचं क्रिकेट जपलं. आज एवढा मोठा झाल्यावरही त्याचे पाय क्रिकेटच्या पीचवर घट्ट रोवलेले आहेत. तो कधी शिष्ट झाला नाही, साधाच राहिला आणि त्याची बायकोही तितकीच साधी आहे. साहित्य सहवासचा तर तो आवडता होताच. तो दुसरीकडे राहायला गेला तरी अजूनही तो आम्हाला आमचाच सचिन वाटतो. मी फारसं क्रिकेट पाहत नाही. पण सचिन खेळत असला की मात्र पाहते. त्याच्या खेळाचं कधीकधी मलाच दडपण येतं. कारण मला त्याला आऊट होताना पाहायचं नसतं. आज त्याच्याभोवती असलेल्या वलयामुळे त्याला खाजगी आयुष्य राहिलेलं नाही. पण तरीही त्याने जी माणसं जपली आहेत. जी नाती जपली आहेत, ते पाहिलं की अभिमान वाटतो. साहित्य सहवासशी असलेले अनुबंध त्याने अजूनही जपून ठेवले आहेत. पक्की मुल्यं, उत्तम संस्कार, निर्मळ मन आणि शुद्ध चारित्र्य असलेला सचिन कधीच 'आउट' होणार नाही.

त्याचा खेळ म्हणजे जणू तप...संदीप खरे
| प्रचंड एकाग्रता, कोणताही दबाव झुगारून समर्थपणाने खेळण्याची प्रवृत्ती आणि प्रत्येक अॅक्शन काटेकोर ही सचिनच्या खेळाची वैशिष्ट्ये मला विशेष भाव जन्मभर एखाद्या गायकाने रियाझ केल्यानंतर त्याला परिपूर्णता लाभते. सचिनने मात्र एवढ्या लहान वयात मिळवलेली ही परिपूर्णता खरोखर थक्क करणारी आहे. कधी कधी स्वत:च्याच विक्रमांचे, कामगिरीचे दडपण येण्याची शक्यता असते. सचिन मात्र हे सगळे दबाव विसरून आजही लाजवाब खेळ करत आहे. एक कवी म्हणून त्याला भेटण्याची, त्याच्यासमोर कार्यक्रम करण्याची इच्छा न बाळगता एक निस्सीम चाहता म्हणून मला त्याला फक्त बघायचंय. मी त्याच्यावर केलेल्या कवितेला त्याने मनापासून दाद दिली असून त्याने ती मला पाठवायला सांगितली आहे, याचेच समाधान आहे. ठ्ठ संदीप खरे, कवी |
आता युक्तीचा खेळ हवा... - विठ्ठल कामत
ऑडिर्नरी ते एक्ट्रा ऑडिर्नरी माणसाने कसे बनावे हे सचिनने दाखवून दिले आहे। सर्वसामान्य कुटुंबात जन्मल्यावर माणसावर विशिष्ट प्रदेशाचा किंवा
बसतो. म्हणजे लोक त्याला त्या भागापुरता मानू लागतात. सचिनने या सगळ्या मार्यादा, चौकटी मोडून टाकल्या आणि आज सचिन संपूर्ण देशाचा बनला आहे. ऑकिर्डमध्ये गेली सात वषेर् भारताची क्रिकेट टिम उतरत होती। तेव्हा सचिनची आणि माझी वारंवार भेट होत असे. पण इतकी वषेर् होऊनही सचिनच्या वागणूकीत अजिबात फरक पडलेला नाही. कारण सचिन स्वत:च्या कामगिरीला महत्त्व देतो. त्यामुळे त्याचे डोळे, कान सतत उघडे असतात. त्यामुळेच त्याचे स्वत:ची मानसिक, शारीरिक प्रगती केली. वाट्याला आलेल्या अपशब्दांचा त्याने कधीच बाऊ केला नाही. कारण त्याचे दोन्ही पाय जमिनीवर आहे. तो प्रत्येक बॉलवर सिक्स मारत नाही तर तशा बॉलची वाट पाहातो हे जास्त महत्त्वाचे. मी इतकेच म्हणणे ही प्लेज टू द मेरिट ऑफ द बॉल अॅण्ड ही क्रिएट मेरिट प्रॉम हिज बॅट. त्याच्या आजवरच्या कारकिदीर्कडे नजर टाकली तर मला वाटते तो सर्व टिमचे प्रेशर घेऊ शकत नाही. हा अनुभव त्याला कॅप्टन केल्यावर आला पण नम्रपणे त्याने कॅप्टनशीप नाकारली. पण सचिन काळानुरुप बदलत मात्र राहिला. याचे कारण त्याच्यावरचे अस्सल मराठमोळे संस्कार. त्याच्या आई वडिलांबरोबरच त्याचा मोठा भाऊ अजितचा याचा मोठा वाटा आहे.
भारताचा सर्वात स्टाईलिश बॅट्समन मला गंुडप्पा विश्वनाथ वाटतो. कारण तो बॉलला दिशा द्यायचा. उलट सचिनबद्दल मी म्हणणे तो बॉलला गती देतो. २० वषेर् क्रिकेट खेळल्यानंतर माणसाची ताकद कमी होणे स्वाभाविक असते. त्यामुळे आता त्याने ताकदीचा विचार न करता युक्तीचा विचार करणे गरजेचे वाटते. त्याचा खेळ तसा बदलूही लागला आहे. सचिन असाच युक्तीने खेळत राहो अशा माझ्या त्याला शुभेच्छा.

परिपूर्ण कलाकार---बिग B
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कारकीदीर्ला यंदा २० वर्षं पूर्ण होत आहेत. एखाद्या खेळाडूने इतक्या सातत्याने कारकिदीर्ची वीस वर्षं गाजवणं, हा च
मत्कार म्हणावा लागेल. सचिनच्या असंख्य चाहत्यांमध्ये लता मंगेशकर, सोनू निगम, आमीर खान हेदेखील आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे बॉलीवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन... 'सात हिंदुस्तानी' पासून 'पा' पर्यंत गेली चाळीस वर्षं अनेक संकटांचा सामना करत बॉलिवूडमध्ये अढळपदाला पोहोचलेल्या 'बिग बी' चा सचिनही मोठा फॅन! सचिनच्या कारकीदीर्च्या विसाव्या वर्षानिमित्त अमिताभने दिलेली ही खास मुलाखत...
...............
* सचिन तेंडुलकर आता त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीदीर्ची २० वर्षं पूर्ण करतोय. तुम्ही या २० वर्षांकडे कसे बघता?
: अविश्वसनीय! एखाद्या खेळाडूची कारकीर्द इतकी प्रदीर्घ आणि यशस्वी असणे हा चमत्कारच म्हणायला हवा. त्याची आताची इनिंग (ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७५) ही तर त्याच्याबरोबर खेळणाऱ्या पंचविशीच्या तरुणालाही लाजवेल अशी होती. तो खरंच महान आहे.
* लिटल वंडर सचिन स्वत: एक आयकॉन आहे. पण तो तुमचाही मोठा फॅन आहे. इतकी महान व्यक्ती तुमची फॅन आहे, ही भावना कशी आहे?
: खरं सांगायचं तर हा माझा गौरव आहे, की सचिनसारखा माणूस माझा फॅन आहे. त्याचं माझ्यावर इतकं प्रेम आहे याबद्दलच मी स्वत:ला भाग्यवान समजतो.
* सचिनच्या बॅटिंगमधल्या कोणत्या गोष्टीचं तुम्हाला कौतुक वाटतं?
: सचिन जेव्हा स्टान्स घेतो, तेव्हा त्याच्या देहबोलीतूनच आत्मविश्वास दिसून येतो. समोरचा गोलंदाज कोणीही असो, ज्या बेडरपणे तो गोलंदाजाचा चेंडू सीमापार पाठवतोे, त्याला तोड नाही. त्याचे सगळे फटके म्हणजे एक वेगवान कविता असते, पण मला स्वत:ला त्याचा पंच्ड ऑफ ड्राइव्ह खूप आवडतो.
* तुम्ही स्वत: चालतीबोलती दंतकथा आहात आणि इतकी वर्ष प्रसिद्धीच्या झोतात आहात. इतकी वर्षं सचिनने मैदानावर आणि बाहेरही ज्याप्रकारे ताण हाताळला, त्याकडे तुम्ही कसं बघता?
: पहिली गोष्ट, मी महान नाही. पण सचिन एक परिपूर्ण कलाकार आहे आणि अशा सगळ्या कलाकारांना असे ताण हाताळायची दैवी देणगी असते. माझा असा विश्वास आहे की, असे ताणतणाव असल्याखेरीज कलाकार त्यांची उत्कृष्ट कलाकृती घडवू शकत नाहीत. सततचा ताणच त्याला नवनवे विक्रम करण्याची प्रेरणा देत असावा.
* अमितजी, तुम्ही कधी सचिनच्या बॅटिंगसाठी शूटिंगला उशीर केलाय किंवा एखादी ठरलेली भेट पुढे ढकलली आहे?
: हो, खूपदा...
* सचिन रंगात असतो त्यावेळी कोट्यवधी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. अचानक मॅच बघणारे लोक रिलॅक्स असतात. असं म्हणतात, की बँकेचा कॅशियरसुद्धा त्याची फलंदाजी पाहताना खुशीत येऊन पैसे देतो. तुमच्या शूटिंगदरम्यान असा फिल गुड फॅक्टर कधी जाणवला का?
: सचिन खेळत असताना एक सकारात्मक वातावरण असतं आणि शूटिंगदरम्यान तर नुसती धमाल सुरू असते. त्याच्या प्रत्येक फटक्याला जोरदार दाद दिली जाते.
* सचिनच्या काही इनिंग्ज ज्या तुम्हाला अजूनही लक्षात आहेत...
: छे, छे! त्याचा रेकॉर्ड तपासून बघा ना. त्याच्या इनिंग्जपैकी एखादी चांगली, असं कोणी निवडू शकेल का? आणि माझ्यासाठी म्हणाल, तर त्याची प्रत्येक इनिंग्ज तितकीच संस्मरणीय आहे.
* तुम्हाला आठवतं का, सचिन आणि तुमची पहिली भेट कधी आणि कशी झाली होती? आणि त्याच्याबद्दल तुमचं पहिलं मत काय होतं?
: आमची पहिली भेट कधी झाली ते मला आता आठवत नाही, पण इतकं मात्र नक्की, की पहिल्या भेटीप्रमाणेच आजही तो तसाच आणि तेवढाच नम्र आणि काहीसा लाजराबुजराच आहे. अनेकदा त्याला लोकांपुढे यायचं नसतं.
* सचिन एकदा कौन बनेगा करोडपतीमध्ये आला होता. त्याशिवाय तुम्ही दोघांनी एकत्र जाहिरातीही केल्या आहेत. कॅमेऱ्यासमोर तुमच्याबरोबर वावरताना सचिनचा वावर कसा होता?
: आमच्या दोघांचे सूर लगेचच जुळले. त्याने हातात घेतलेली कामं खूप चांगल्या प्रकारे पार पाडली होती.
* प्रसिद्ध व्यक्तींचे आयुष्य बऱ्याचदा वादात अडकलेली असतात. पण सचिन इतक्या वर्षांच्या कारकीदीर्त वादांपासून दूरच राहिला. याबद्दल तुम्हाला कधी आश्चर्य नाही वाटलं?
तो लोकांसमोर आणि खाजगी आयुष्यातही खूप साधेपणाने वागतो. या साधेपणामुळेच तो आज या स्थानावर पोहोचला आहे. वादांपासून अलिप्त राहणं तितकंसं सोपं नसतं. त्यासाठी प्रचंड मानसिक तयारी लागते. २० वर्षांच्या कारकीदीर्त सचिनला ते खूपच छान जमलंय. मला वाटतं, तो नेहमी संयमाने वागतो आणि तोंडाने उत्तर देण्याऐवजी त्याची बॅटच जास्त चांगली आणि स्पष्ट बोलते. आणि ती एकदा बोलली की मग चूक-बरोबर, वादाचे मुद्दे सगळं क्षुल्लक वाटतं.
* फलंदाज किंवा एक खेळाडू वगळता सचिनमधील इतर कोणते गुण तुम्हाला जास्त भावतात?
: त्याची सभ्य वर्तणूक आणि पुढे पुढे न करण्याचा स्वभाव.
* तुमच्याशिवाय तुमच्या कुटुंबातील आणखी कोण सचिनचे चाहते आहेत?
: आमच्या घरातील सगळेच सचिनचे खूप मोठे चाहते आहेत.
* तुमच्या आणि सचिनच्याही बाबतीत वय म्हणजे फक्त एक आकडा ठरतो. तुमच्या कामगिरीवर वयाचा परिणाम दिसत नाही. मग निवृत्तीचा विचारही...
: छे छे! निदान इथे तरी माझी आणि सचिनची तुलना करू नका. तो कदाचित त्याच्या फटकेबाज इनिंग्जमधून आपल्या बरोबर असेल किंवा नसेलही. आमीर खान एकदा म्हणाला होता, की लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना ते सवोर्त्तम आहेत हे माहीत असूनही लोकांनी त्यांना स्वत:ला तसं म्हणताना कधी ऐकलं नाही. ज्यांना लोक सवोर्त्तम म्हणतात त्यांना आतून ठाऊक असतं की अजूनही आपल्या क्षमतेइतकं आपण काही केलंच नाही. सचिन तसाच आहे. आणि म्हणूनच तो मास्टर आहे.

माझ्या घरात सचिन राहतो...--अभिनव बिंद्रा
मी अन् क्रिकेटचा चाहता? छे अजिबातच नाही... कसं शक्य आहे ते? या खेळातील माझं कुतूहल फक्त सचिन तेंडुलकर पुरतंच मर्यादित आहे. इतर कुठल्याही भारतीय फलंदाजाचा खेळ मी पाहिलेला नाही. सचिन बाद झाला की मी टीव्ही बंद करतोे. माझ्यासाठी सामनाच संपलेला असतो. यामुळेच मी सच्चा क्रिकेटप्रेमी आहे, असे म्हणता येणार नाही. क्रिकेट आवडत नाही; पण तरीही सचिनला आदर्श मानतो, अशी व्यक्ती आढळणे कठीणच. त्या थोड्याथोडक्या व्यक्तींमधील मी एक.
१९९६च्या र्वल्ड कपपासून मी क्रिकेट पहायला लागलो किंबहुना सचिनला पहायला लागलो असे म्हटले तरी चालेल. त्याचा जोश, आक्रमकता, गुण पाहून भारावून गेलो होतो. आजही सामन्यागणिक त्याच्या खेळात सुधारणा होतेय, ही बाब विलक्षण. त्याच्या प्रत्येक फटक्यात एक आगळी नजाकत असते. क्रिकेटप्रेमी, चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे सतत त्याच्या खांद्यावर असते; पण हे दडपण जुगारून झकास खेळणे त्याला छान जमते.
अलीकडेच सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७५ धावांची शानदार खेळी केली. त्याची शारजातील वादळी खेळी तर अफलातूनच; पण मला त्याची विंडिजविरुद्धची ४४ धावांची खेळी (त्रिनिदाद १९९७) अधिक आवडते. अॅब्रोज, वॉल्श व बिशप यांचा मारा परतवून लावत या पठ्ठ्याने डोळ्याचे पारणे फेडले होते. खेळपट्टी गोलंदाजांसाठी नंदनवन ठरत होती, ढगाळ वातारणात भारताचे इतर फलंदाज अपेशी ठरत होते. सचिन मात्र खेळपट्टीवर ठाण मांडून उभा होता.
असं वाटतं त्याच्या भोवती एक सुरक्षाकवच आहे, जे संकटांपासून त्याचं रक्षण करतंय. अन्यथा इतकी वषेर् न अडखळता खेळणे कठीणच! सचिनच्या या यशस्वी वाटेवर दुखापतींच्या रुपाने संकटं आली खरी, पण बेडरपणे सचिन त्यांना सामोरा गेला. त्याची धावांची भूकही कमी झालेली नाही. १९९८ च्या क्वालालंपूर राष्ट्रकुल स्पधेर्दरम्यान सचिन व माझी प्रथमच भेट झाली! त्यावेळी मी अवघा १३ वर्षांचा होतो. तेव्हा छायाचित्रकाराने माझा व सचिनचा एकत्र फोटो काढला. गंमत सांगू तो फोटो त्या छायात्रिकाराकडून मिळवण्यासाठी मी जीवाचा आटापीटा केला होता. आजही घरातील भिंतीवर तो फोटो कायम आहे. त्याच्यासह यापुढेही अशाच भेटीगाठी होत राहो, अशी इच्छा त्यावेळी मी देवापुढे व्यक्त केली होती. तब्बल अकरा वर्षांनी म्हणजे गेल्याच सोमवारी माझी ही इच्छा पूर्ण झाली. एका कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. सचिनशी औपचारिक गप्पा झाल्या. 'तू ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवलंस त्या शेवटच्या गनशॉटबद्दल मला जाणून घ्यायचंय', अशी विचारपूस त्याने केली अन् गप्पा रंगत गेल्या. एक सांगू... त्या भेटीत मी पुन्हा एकदा त्याचा चाहता झालो!

एक छोटा क्रिकेटवीर!--अजित तेंदुलकर
आज आपल्या सर्वांना सचिनरूपी एव्हरेस्ट दिसतो. पण, तो पर्वत असताना त्याला सर्वात आधी ओळखला तो त्याच्या भावाने अजित तेंडुलकरने! आपल्या छोट्या भावात काहीतरी वेगळं आहे आणि त्याला योग्य आकार दिला पाहिजे, या एकाच ध्येयाने अजित झपाटला आणि त्यामुळे सचिन घडला... त्या अजितच्या शब्दात सचिनचे रेखाटलेले हे अफलातून चित्र!
.................
नितीन, सविता आणि मी, आमच्यापेक्षा सचिनचं बालपण वेगळ्या वातावरणात गेलं. सचिन आणि माझ्यामध्ये जवळजवळ अकरा वर्षांचं अंतर. मला वाटतं आमच्या वयातल्या या अंतरामुळे बराच फरक पडला. सचिन जेव्हा छोटुला होता, तेव्हा मी आणि नितीन दोघंही अक्षरक्ष: क्रिकेटवेडे होतो. काही काळाने मी शाळेसाठी क्रिकेट खेळू लागलो, मग कॉलेजसाठी अन् त्यानंतर इतर अनेक क्लबसाठी. सामन्यांसाठी क्रिकेटचं किट घेऊन घराबाहेर पडताना तो मला पाहायचा. खेळाविषयीच्या ताज्या घडमोडींवर होणाऱ्या आमच्या चर्चाही तो ऐकायचा. बहुधा, याचाच परिणाम म्हणून त्याच्यातल्या खेळाविषयीच्या जाणीवा अगदी लहानपणापासून जाग्या झाल्या.
'साहित्य सहवास' चं मैदान तसं बऱ्यापैकी मोठं. साधारण तीस यार्डाचं. मुंबईमध्ये ही तशी नवलाईच. हे बऱ्यापैकी मोठं मैदानच आमच्या सोसायटीतल्या तरूण पिढीला खेळण्यासाठी प्रवृत्त करायचं, जणू आमंत्रणचं द्यायचं. सोसायटीतल्या अकरा इमारती मिळून दोन संघ सहज तयार होऊ शकतील, इतकी निरनिराळ्या वयाची मुलं सोसायटीत होती.
लहान मुलं सायकल दौडवण्यात, भोवरे खेळण्यात, गोट्या खेळण्यात अन् पतंग उडवण्यात मग्न असायची. सचिन तर नेहमीच त्यात व्यग्र राहायचा... सचिन तसा तुडतुड्या. सतत काहीतरी करायचा. एका जागी बसून राहणं जणू त्याला मान्यच नव्हतं. अवतीभवती त्याची धावपळ सुरू असायची. साहजिकच, मैदानी खेळाबद्दलचा त्याचा रस वाढत राहिला. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये दुपारच्या वेळी त्याचे दोस्त आपापल्या घरी परतायचे. कधी कॉमिक्स वाचायला, तर कधी पत्ते किंवा स्क्रॅकबल खेळायला. पण, सचिन मात्र घरी न येता खाली मैदानावरच काय मिळेल ते खेळत रेंगाळायचा.
त्याला घरी एका जागी बांधून टाकायची ती फक्त एकच गोष्ट टीव्ही! टीव्हीवर विविध खेळाचं प्रसारण सुरू असलं की मात्र तो खिळून राहायचा. १९८१ साली बियॉ बोर्ग व जॉन मॅकेन्रो यांच्यात विम्बल्डनची लढत त्याने अक्षरक्ष: डोळा लावून पाहिली. आम्हा साऱ्यांना बोर्गने विजेता ठरलेलं पाहायचं होतं. पण, सचिनचा मात्र अगदी मनापासून पाठिंबा होता तो मॅकन्रोला! प्रत्यक्षात जेव्हा मॅकेन्रो जिंकला तेव्हा सचिनच्या आनंदाला पारावार राहिलेला नव्हता. त्या क्षणीच तो त्या तरूण अमेरिकन स्टारचा फॅन झाला. मॅकेन्रोचा सचिनवरचा प्रभाव इतका मोठा होता की त्याने एकदा टेनिस रॅकेटची, एका हेड बँडची अन दोन रिस्ट बँडची मागणी केली. त्याला त्याच्या हिरोसारखं दिसायचं होतं. सोसायटीतल्या मैदानाभोवती काँक्रिट रस्त्यावर सचिन मॅकेन्रोची नक्कल करायचा. सचिनच्या कुरळ्या केसांमुळे तो मॅकेन्रोची छोटी मूतीर्च वाटायचा. त्याचे मित्र त्याला 'मॅक' म्हणायचे.
मला वाटतं, मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाचं टीव्हीवर होणारं प्रसारणच आम्ही खेळाकडे आकषिर्त होण्यासाठी महत्त्वाचं ठरलं. त्यातच भरच पडली ती आमच्या सोसायटी डेच्या दिवशी होणाऱ्या स्पर्धांमुळे. क्रिकेटचा सामना व्हायचा, सायकल शर्यत, शंभर मीटर धावण्याची शर्यत, लांब उडी, गोळाफेक सारं काही त्या दिवशी व्हायचं.
आम्हा मोठ्या मुलांकडे पाहून मग छोट्यांनीही संघ तयार केले. आम्ही मैदानावर खेळत असून तर ती मुलं मैदानाभोवतीच्या काँक्रिट रस्त्यावर खेळायची. कधी गॅरेजमध्ये, तर कधी इमारतींच्या गच्चीवर खेळायची. मंंुबईमध्ये असणाऱ्या क्रिकेटच्या वातावरणाचं हे प्रतिबिंब होतं.
'साहित्य सहवास'मधल्या काही छोट्यांची प्रगती तर त्यांना आम्हा मोठ्या मुलांच्या संघात सामावून गेली. त्यापैकीच सचिन एक होता! आमच्या बरोबरीने खेळायची संधी मिळाल्यामुळे तो कमालीचा खूश होऊन गेला. मोठ्या मुलांमध्ये शांत अन् लाजराबुजरा असायचा, घरी आला की मात्र मोठ्या आत्मविश्वासाने बोलायचा. अशावेळी काल परवाचा लहानसा, अंगठा चोखत, केसातून हात फिरवत (लहानपणीची सवय) आम्हा भावंडाच्या किक्रेटवरील चर्चा ऐकत राहणारा हाच का तो सचिन, असा प्रश्ान् आम्हाला पडत असे... त्याच्यात झालेला बदल आश्वर्यकारक होता. त्याची वाढत जाणारी प्रगल्भता अन् खेळाची त्याची समज यामुळे आमच्या अन् त्याच्या दरम्यान असलेला फरक आम्ही विसरून गेलोे. त्याचा खेळ आम्ही अधिक उत्कंठतेने पाहू लागलो. स्पर्धात्मक क्रिकेट खेळल्यामुळे माझ्या गाठीशी थोडाफार अनुभव होतो. शिवाय, आमच्या घरामध्ये मीच वयाने त्याच्या सर्वात जास्त जवळचा होतो. क्रिकेटचा खेळ अधिक जाणून घेण्यासाठी, फलंदाजी आणि गोलंदाजीच्या अनुषंगाने काही सल्लामसलत करण्यासाठी साहजिकच मग तो माझ्यावर अवलंबून राहू लागला.
याच काळात माझ्या छोट्या भावामध्ये काहीतरी आगळं असं कौशल्य असल्याची मला जाणीव झाली. इतर खेळातल्या आपल्या हिरोंची नक्कल सचिन करत हाता हे खरं. पण त्याचे जे क्रिकेटपटू हिरो होते त्यांची नक्कल करताना मात्र तो कधीच दिसला नाही. फलंदाजी असो वा गोलंदाजी, त्याची स्वत:ची अशी शैली होती. फटके खेळताना तो कधी कचरला नाही. फलंदाजी करताना त्याचे हात विलक्षण सफाईने फिरायचे. खेळ जणू त्याच्या रक्तातच होता, अन् चेंडूचा टप्पा जोखणारा त्याचा अंदाज केवळ वाखण्याजोगा! सचिनच्या शरीराच्या हालचाली, त्याच्यात एक नैसगिर्क खेळाडू दडलेला असण्याचा पुरावा त्याचा खेळ पाहणाऱ्याला देत होत्या.
मी अनेकदा त्याचा खेळ निरखून पाहिला. आणि प्रत्येक वेळी आपण एका खऱ्याखुऱ्या क्रिकेटपटूला पाहत असल्याचंच मला जाणवलं. सचिनच्या ठायी असलेली ही गुणवत्ता वाया जाऊ देता कामा नये, असंच माझ्या मनाने घेतलं.
(अक्षर प्रकाशनच्या 'असा घडला सचिन तेंडुलकर' या पुस्तकावरून साभार)

भेट तुझी माझी स्मरते!--अंजलि तेंदुलकर
सचिन व माझी पहिली भेट झाली ती मुंबई विमानतळावर! १९९०ची ही गोष्ट... भारतीय संघाचे इंग्लंड दौऱ्याहून मायदेशी आगमन झालं होतं. माझ्या आईला आणायला मी विमानतळावर गेले होते. कसोटीतील पहिलंवहिलं शतक झळकावल्यानं सचिनसाठी तो दौरा स्पेशल ठरला होता. त्यावेळी त्याला पहिल्यांदाच पाहिलं... क्रिकेटमध्ये रुची नसल्यानं मी त्याला ओळखलंच नाही. त्यानंतर मित्र, मैत्रिणींद्वारे भेटी झाल्या अन् पाच वर्षांच्या मैत्रीनंतर १९९४मध्ये न्यूझीलंडला साखरपुडा झाला, तर १९९५मध्ये आमचे शुभमंगल झाले! क्रिकेटच्या अज्ञानामुळे मी त्याला ओळखलं नव्हतं. मैत्री झाली तेव्हादेखील माझ्यासाठी तो फक्त सचिन तेंडुलकर होता. लग्नानंतर क्रिकेटचा अभ्यास केला. आज फिल्डिंग पोझिशनपासून क्रिकेटच्या प्रत्येक गोष्टी मला माहिती आहेत; पण घरी असल्यावर सचिनला क्रिकेटवर चर्चा करायला आवडत नाही. कधीकधी दुखापतींमुळे किंवा मनाजोगी कामगिरी न झाल्याने तो निराश होतो, त्यावेळी क्रिकेटविषयी बोलणं होतं.
सचिनच्या लोकप्रियतेमुळे कुठे बाहेर जायचे म्हणजे थोडे दडपण येते. याबाबतचा एक किस्सा तर धमाल आहे... माझ्या मित्र, मैत्रिणींनी 'रोजा' सिनेमाला जायची योजना आखली होती. तो नाहीच म्हणत होता; पण मी सचिनला आग्रह केला. त्याला कुणी ओळखू नये म्हणून खोटी दाढी लावली, एक चष्माही दिला. सिनेमाला थोडं उशीराच गेलो. सगळं व्यवस्थित झालं; पण मध्यंतराला चष्मा पडल्यानं लोकांनी त्याला ओळखलं. त्यानंतर त्याची व आमची जी तारांबळ उडाली त्याचं शब्दात वर्णन करणं कठीणच! 'रोजा'चा उतरार्ध आम्ही पाहिलाच नाही.
सचिनची 'बेटरहाफ' झाल्यावर डॉक्टरकी सोडली. तो निर्णय स्वखुषीने घेतल्याने त्याबद्दल पश्चात्ताप नाही. सचिन बऱ्याच गोष्टींसाठी माझ्यावर अवलंबून असल्यानं डॉक्टरकी करणं शक्य नव्हतं. प्रत्येक गोष्ट त्याच्या हाती मिळावी, त्याला कोणतीही कमतरता जाणवू नये म्हणून घरीच राहण्याचा निर्णय घेतला. लहानपणी मोठा भाऊ अजितने सचिनसाठी अनेक गोष्टींचा त्याग केला. लग्नानंतर ९ ते ५ नोकरी करण्याऐवजी अजितप्रमाणे सचिनसाठी उपलब्ध असण्याचा निर्णय घेतला.
रविवारी तो आंतरराष्ट्रीय कारकिदीर्ला २० वषेर् पूर्ण करतोय, पण आजही तो फलंदाजीला आला की मी अस्वस्थ होते. खूप दडपण येतं, म्हणून त्यावेळी फोन घेत नाही. घरातील एका विशिष्ट जागेवर बसून मी त्याची फलंदाजी पाहते. ती जागा लकी आहे असे वाटते. त्यावेळी हात आपसूक जोडले जातात. टीव्ही व गणपती बाप्पाच्या फोटोवर माझी नजर असते. त्यादिवशी मी काहीच खात नाही. गेली १९ वषेर् त्याला ओळखतेय. आधी त्याची खास मैत्रीण होते अन् आता पत्नी. त्यामुळे या दडपणाची सवय झालीय. मीच काय पण आमची दोन मुलं व पूर्ण कुटुंबाला या साऱ्या गोष्टीची सवय झालीय...

सचिनमुळे आपण एकत्र येतो!--दिलीप प्रभावलकर
आजचं बदललेलं क्रिकेट मला आवडत नाही. मूळचा मी क्रिकेटचा चाहता, पण आज या खेळाला इव्हेण्टचं जे स्वरूप आलंय त्याने माझ्या मनात क्रिकेटविषयी दुरावा निर्माण झालाय. एखाद्या कुशल खानसाम्याला फूडमॉलमध्ये काम करायला लावण्यासारखं वाटतं मला हे. पण सचिन खेळायला आला की माझ्या मनात निर्माण झालेली ही अढी क्षणात दूर होते आणि जुनं प्रेम उफाळून येतं. सचिनमुळेच मी क्रिकेटकडे पुन्हा ओढला जातो.
चोवीस वर्षांपूवीर् मी आणि सुरेश खरेंनी एक व्हिडिओ प्रॉडक्शन युनिट काढलं होतं. सुरुवातीच्या काळात आम्हाला खेळांवरच्या शैक्षणिक व्हिडिओ फिल्म्स बनवायचं काम मिळालं होतं. 'हाउ टू प्ले क्रिकेट' अशी एक फिल्म बनवायची होती. क्रिकेटचा श्ाीगणेशा करणाऱ्यांसाठी बेसिक माहिती द्यायची होती. म्हणजे, अमूक स्ट्रोक कसा मारतात, हूक कसा करावा, एलबीडब्ल्यू कसा ठरतो वगैरे. याचं प्रात्यक्षिक दाखवायला आम्हाला काही ज्युनियर खेळाडू हवे होते. मी शारदाश्ाम कॉलनीत राहायचो. समोरच शारदाश्ाम शाळा होती. तिथे जाऊन मी रमाकांत आचरेकर सरांना भेटलो. त्यांनी मला शिवाजी पार्कवर बोलवलं तिथे मी गेलो तेव्हा आचरेकर सर स्वत: मैदानाला पाइपाने पाणी घालत होते. आमच्या बरोबर दिग्दर्शक विनायक चासकरही होते. मुलांनी आम्हाला प्रात्यक्षिकं दाखवली. त्यांच्यात बारा-साडेबारा वर्षांचा सचिन तेंडुलकर होता. अगदी बारीक आणि कुरळ्या केसांचा. त्याच दिवसांत सचिन आणि विनोद कांबळीने हॅरिस शील्डला पार्टनरशिपचे र्वल्डरेकॉर्ड केले होते, त्यामुळे रेकॉर्ड करणारी पोरं म्हणून आम्हाला त्यांची नावं माहीत होती. मला आठवतंय, तेव्हा आचरेकर सर आमच्याशी बोलताना म्हणाले होते, 'हा कांबळी टॅलेंटेड आहे पण अधिक स्टायलिश आहे. सिलेक्टर्सवर इम्प्रेशन मारायला बघतो. टेक्निकली तेंडल्या जास्त पफेर्क्ट आहे.'
त्यानंतर माहीमच्या मुघल लेनमध्ये आमच्या एडिटिंग ऑफिसमध्ये आम्ही फिल्म एडिट करायला बसलो होतो तेव्हा ही सगळी मुलं आपण टीव्हीवर कसे दिसतो, हे बघायला आली होती. त्यात सचिन, विनोद, मयूर कदेकर आणि बरीच गुणी मुलं होती. त्यांच्यातला खुचीर्वर बसून गुडघ्यावर कोपर ठेवून हाताच्या तळव्यावर हनुवटी तोलून एकटक फिल्म बघत बसलेल्या सचिनची मुदा मला अजून आठवते.
तो शारदाश्ाम विद्यालयाचा आणि माझीही शाळा तीच. त्यामुळे मला त्याचा अभिमान आहेच, त्याच्यामुळे आमच्या शाळेचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलं याचा मला खूप आनंद होतो.
वीस वर्षं सचिन क्रिकेट खेळतोय. आजच्या कटथ्रोट कॉम्पिटीशनच्या काळात एवढा काळ खेळत राहून ११ जणांच्या टीममध्ये आपलं स्थान टिकवायचं आणि सर्वमान्य व्हायचं, ही गोष्ट सोपी नाही. जिनीअस खेळाडू अजातशत्रू असतातच असं नाही, पण तो तसा आहे. विजय मर्चंट क्रिकेटला 'जटलमन्स गेम' म्हणायचे, तो सचिन खेळतो. त्याच्या अवतीभोवती सटकू, मानभावी, आत्मकेंदित नाठाळ क्रिकेटपटू भरपूर आहेत. पण त्यांच्याही मते सचिन हा जंटलमन आहे. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी लव्हेबल निरागस भाव असतात.
सचिनचं अपिल हे भाषा, प्रांत, धर्म यांच्या पलिकडे आहे. 'लाइकिंग तेंडुलकर' ही वेगळीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपापलं वेगळेपण जपणारे आपण एकत्र येतो, ही त्याची मोठी अचिव्हमेंट आहे.

सर्वोत्तम फलंदाज आणि माणूसही---महेश मांजरेकर
सचिन केवळ फलंदाज म्हणूनच नाही तर माणूस म्हणूनही खूप मोठा आहे. अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून त्याचा हे ग्रेटनेस दिसतो. मी स्वत: त्याचा अनुभव घेतलाय. १९९६ मध्ये आम्ही इंग्रजी 'ऑल द बेस्ट' करत होतो. सोफायामधल्या प्रयोगाला सचिन येणार होता. पण तो येणार म्हणजे सगळं पब्लिक नाटक सोडून त्याला बघणार हे उघड होतं. सचिननेही ते ओळखलं. नाटकाची तिसरी घंटा होईपर्यंत तो थिएटरबाहेर थांबला. तो आलाय हे मध्यंतरापर्यंत त्याने कोणाला कळूच दिलं नाही. हे फक्त तोच करू शकतो. मध्यंतराच्या वेळी तो बॅकस्टेजला आला. अतुल काळे, सतीश राजवाडे, सुनील बवेर् या कलाकारांना भेटला. कलाकारांनी केलेल्या कामाचं त्याने भरभरून कौतुक केलं. त्याचं वावरणं इतकं स्वाभाविक होतं की आम्ही सगळेच खूप प्रभावित झालो. पुढे एका चॅरिटी मॅचमध्ये मला सचिनच्या टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली. सचिन इलेव्हन विरुद्ध हृतिक इलेव्हन असा सामना वानखेडे स्टेडीयमवर रंगला होता. सचिनने मला विचारलं बॉलिंग टाकशील का? मी हो म्हटलं. एक ओव्हर टाकली. आमची बॅटिंग आली तेव्हा मला लवकर बॅटिंग मिळण्याची आशा नव्हती. कारण माझं तेव्हा फारसं नाव नव्हतं. सचिन सोबत अनिल कपूर ओपनर म्हणून क्रिजवर जाणार होते. मी सचिनला म्हटलं की माझ्या एका फिल्मची ट्रायल आहे मला लवकर जायचंय. सचिन पॅड उतरवू लागला तो म्हणाला तू ओपनर जा! मी ओशाळलो नी त्याला म्हणालो, मी वन डाऊन जातो. अनिल लवकर आऊट होणार याबाबत मला अजिबात शंका नव्हती. माझा विश्वास खरा ठरला. अनिल दुसऱ्या ओव्हरला आउट झाला. लोच्या झाला, अजित आगरकरने पॅड बांधायला घेतले. पण सचिनने त्याला सांगितलं महेशला जाऊ दे! मला भरून पावलं. मी ठरवलं आता आऊट व्हायचं नाही. आम्ही दोघांनी १२० ची पार्टनरशिप केली. सचिनने ८२ धावा केल्या मी ५२. दोघांचं अर्धशतक झालं. समोर कपिल, अक्षयकुमार सारखे गोलंदाज असून आम्ही दोघे नॉट आऊट राहिलो. इतरांना बॅटिंग मिळावी म्हणून रिटायर्ड झालो. ही मॅच आम्ही जिंकली. खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये मी माझ्या आयुष्यातले सर्वाधिक आनंददायी क्षण अनुभवले. खेळताना एकदा सचिनने स्ट्रेट ड्राइव्ह मारला. बॉल माझ्या मांडीवर आदळला. यात सचिनची काहीही चूक नसताना तो मला अनेकदा 'सॉरी' म्हणाला. या बॉलने माझ्या मांडीला झालेली दुखापत मी अनेक दिवस फार प्रेमाने जपली. एका महान फलंदाजाने हाणलेल्या चेंडूची ती आठवण होती. अशा अनेक आठवणी आहेत. तो जगातला सवोर्त्कृष्ठ फलंदाज आहे आणि सवोर्त्तम माणूसही...
आजही नम्र, निरागस----- गौतम राजाध्यक्ष, फोटोग्राफर
सचिनचे फोटो पहिल्यांदा काढले ते षट्कार पाक्षिकासाठी. १९९३-९४ च्या सुमारास. सोबत संजय मांजरेकरही होता. तेव्हा कुरळ्या-कुरळ्या केसांचा अबोल, निरागस, गोड सचिन आणि धीट संजय या दोघांच्या व्यक्तिमत्त्वामधला फरक ठळकपणे जाणवला. सचिन आजही तस्साच आहे. दरम्यानच्या काळात एका सोसायटी मॅगझिनसाठी, नंतर अजित तेंडुलकरने लिहिलेल्या 'असा घडला सचिन' पुस्तकाच्या कव्हरसाठी आणि तीन वर्षांपूवीर् माझ्या लेखासाठी त्याचे फोटो काढले. त्या प्रत्येकवेळी त्याच्या चेहऱ्यावरचा कोवळा, निरागस भाव कायम होता. तो हसला की एक हजार वॉटचा बल्ब लावल्यासारखे वाटते. त्यामुळे एवढ्या वर्षांत उन्हात खेळून त्याच्या चेहऱ्यावर एखादी सुरकुती आलीही असेल, पण तो हसला की लहानगा सचिनच वाटतो. अजित त्याला फोटोसाठी घेऊन आला होता, तेव्हा त्याच्या सर्व सूचना सचिन निमूटपणे ऐकत होता. फोटोसाठी मी सांगेन तसे करण्याचा प्रयत्न करत होता. आजही तो तेवढाच आज्ञाधारक आहे. आजही कॅमेऱ्याला तो धीटपणे फेस करू शकत नाही, तो बावरतो. मी त्याला तसे सांगितल्यावर त्याने ते लगेच मान्य केले. जाहिराती, शुटींग ही माझी क्षेत्रे नाहीत, क्रिकेट हे माझे क्षेत्र आहे, असे त्याने नम्रपणे सांगितले. अर्जुनाला जसा केवळ माशाचा डोळा दिसत होता, तसे क्रिकेट हे त्याचे एकमेव लक्ष्य आहे. त्यामुळेच तो एवढी मोठी मजल मारू शकला.
एखाद्या समारंभात तो आला की आवर्जून भेटतो, नमस्कार करतो, नम्रपणे बोलतो. मला त्याने कशाला एवढे महत्त्व द्यायचे? त्याने ओळख दाखवली नाही तरी त्याची गुणवत्ता कमी होणार नाही. पण ग्रेट माणसांमध्ये इथेच फरक असतो. सचिनसारखी ग्रेट माणसे यशानंतर, अनुभवानंतर अधिक नम्र होत जातात.

सच्चा मित्र!--- अजित आगरकर
आंतराष्ट्रीय कारकिदीर्ची वीस वर्षे... खरंच या पठ्ठ्याचे कौतुक करावं तितकं थोडंच. गेली अनेक वर्ष मी सचिनबरोबर खेळतोय, त्याचा खेळ जवळून पाहण्याची संधी मिळाली. अनेक यादगार खेळी तो खेळलाय. खरंतर मला आवडणारी त्याची एखादी खेळी सांगणं कठीणच! तरीही माझ्या डोळ्यासमोर येते ती शारजामधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची १४३ धावांची वादळी खेळी. खरं, सांगू त्यावेळी मी संघात असूनही त्याचा खेळ पाहिला नव्हता. पॅव्हेलियनमध्ये बसून सचिन असाच खेळत राहो, अशी प्रार्थना करत होतो. आमचा फायनलमधील प्रवेश त्या सामन्यातील नेट रनरेटवर ठरणार होता. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढले होते. सचिनच्या अफलातून खेळीने संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. नंतर हायलाईट्समध्ये तो सामना पाहताना सचिनची फलंदाजी मनसोक्त पाहिली. पाच षटकार, नऊ चौकारांसह त्याने १३१ चेंडूत १४३ धावा चोपून काढल्या होत्या. शारजातील त्या खेळीतील प्रत्येक फटका आजही डोळ्यासमोर येतो.
कटू प्रसंगांना तोंड देताना मित्र व संघसहकारी म्हणून सचिन सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. मुंबई संघात पदार्पण केलं तेव्हा संजय मांजरेकर व सचिननेच प्रोत्साहन दिले. त्यामुळे फारसं दडपण आलं नाही. भारतीय संघात माझी निवड झाल्याची बातमी ऐकल्यावर खूप आनंद झाला होता, पण दडपणही आले. खूप अस्वस्थ होतो, चांगली कामगिरी होईल का, हेच विचार सतत मनात येत होते. त्यावेळी सचिनने एक मार्गदर्शक व मित्र म्हणून खांद्यावर हात ठेवून समजावले, अन् मनातली भिती कुठे पळून गेली ते कळलंच नाही.
कठीण प्रसंगात मित्र म्हणून त्याचा जसा पाठिंबा लाभला, तसंच त्याच्या असण्याने ड्रेसिंगरुमचे वातावरण खुलते. समोरचा माणूस दुखावणार नाही, हे लक्षात ठेवून तो छान गंमती-जमती करतो. ज्या खेळाडूंसह त्याने मुंबईचे प्रतिनिधित्व केले, असे त्याच्या पिढीतील फारसे खेळाडू आताच्या संघात नाहीत. नवे चेहरे संघात सामील झालेत. त्यामुळे सचिन मुंबईच्या ड्रेसिंगरुमध्ये असतो, तेव्हा ही सारी नवी पोरं र्नव्हस होतात, पण मनमोकळा स्वभाव व खिलाडूवृत्तीने सचिन ज्युनियर-सीनियर हे अंतर कधी कमी करतो, तेच कळत नाही. हा माणूस म्हणजे जणू सद्गुणांची खाणच! प्रत्येक खेळाडूचा एक आवडता फटका असतो सचिन मात्र प्रत्येक फटका लीलया खेळतो. कार, वॉचेस, म्युझिक त्याला प्रचंड आवडतं, सध्या आयपॉड वैगरेअसल्याने सीडीज, कॅसेट्स घेऊन जाण्याची तारेवरची कसरत त्याला करावी लागत नाही.
गेल्या वीस वर्षांत सचिनच्या स्वभावात बदल झालेला नाही. माणुसकी तो जपतो. तो असाच अनेक वर्ष खेळत राहो, त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ असाच सुरू राहो... सचिनला माझ्या मनापासून शुभेच्छा.

मोठा माणूस--राज ठाकरे
शिवाजी पार्कमधील आम्ही सगळे 'अंडरआर्म'वाले... जोरजोरात बॉल टाकणारे. मीही त्यावेळी जोरात बॉल टाकायचो. एकदा आम्ही एमआयजी क्लबवर सचिनसोबत 'अंडरआर्म'ची मॅच घेतली. सचिन टूरवर जाण्याआधी आमची मॅच होती. आधीच रबरी बॉल, त्यात विकेट ओलसर असल्याने तो तुफान वेगात जायचा. अतुल रानडे, सुनील हषेर् अशी सगळी आमची टीम होती. सचिनने त्यावेळी तुफान बॅटिंग केली... दोन-तीन रबरी बॉल फोडूनही टाकले. माझ्या बोलिंगवरही त्याने फोर-सिक्स मारले. माझी बोलिंग त्याने चांगलीच झोडपली तरीही सचिनच्या फोर-सिक्सचेच मला अधिक कौतुक होते.
मॅच संपवून आम्ही नेटबाहेर बसलो होतो. रात्री मी आणि सचिन जेवायला जाणार होतो. आम्ही तसे बऱ्याचदा जेवायला भेटतो. मात्र त्यादिवशी सचिन म्हणाला, 'माझा हात खूप दुखतोय, आजचे रात्रीचे जेवण आपण कॅन्सल करूया. हाताचे दुखणे सहन होत नसल्याने रात्रीचे जेवण आपण एकत्र घेणे मला जमणार नाही.' तो दिवस सचिनच्या 'टेनिस एल्बो'चा होता. पुढे सचिनचा हात फारच दुखायला लागला आणि त्याला 'टेनिस एल्बो'ची शस्त्रक्रिया करावी लागली. यात जवळपास महिना गेला. ऑपरेशन झाले लंडनमध्ये. हॉस्पिटलमधून ज्या दिवशी सचिनला डिस्चार्ज मिळाला तेव्हा योगायोगाने त्यादिवशी मीही लंडनमध्ये होतो. त्यामुळे आमच्या जेवणाचा बेत त्यादिवशी लंडनमध्ये पार पडला. ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे ब्रम्हदेशाचे फूड फार छान मिळते. जेवताना त्याने मला त्याच्यावरील ऑपरेशनबाबत सगळी बारिकसारिक माहिती सांगितली।
लतादिदी असो की सचिन तेंडुलकर, ही माणसे कोणताही पुरस्कार मिळण्याआधीच मोठी झाली आहेत. त्यांचे कर्तृत्व हे त्यांना मिळणाऱ्या पुरस्कारापेक्षा मोठे आहे. सचिनला अजून 'भारतरत्न' मिळाला नसला तरी त्याने क्रीडाक्षेत्रात भारतला जो बहुमान दिला आहे त्याच्या जोरावर सर्वसामान्यांच्या मनात तो 'भारतरत्ना'सारखाच आहे. त्याची इतर कोणत्या खेळाडूशी तुलना करायची म्हटले तरी मला ती करता येणार नाही. सर्वच बाबतीत तो सर्वांच्या पुढे आहे.
सचिनमध्ये बरेच गुण आहेत, मात्र कोणत्याही गोष्टीच्या खोलात जाणे हा त्याचा गुण मला सर्वाधिक मोठा वाटतो. घड्याळ असो की कार, ऑडिओ सिस्टिम असो की एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू. तो त्या वस्तूच्या खोलात जातो. त्या वस्तूमध्ये नेमके कोणते पार्टस् आहेत, त्यांचे नेमके कार्य काय याची तो सखोल माहिती करून घेतो आणि समोरच्याला ती देतोही.
सचिनच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मी त्याला सर्वप्रथम भेटलो. त्यानंतर आजतागायत आम्ही भेटतच आलो आहोत आणि आमच्यात चांगलेच मैत्रीसंबंध आहेत. मुंबईतील त्याच्या मॅचेस मी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. एरवी त्या मी टीव्हीवरच बघतो. अत्यंत सरळ, मनमिळावू, विनम्र असा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे सहसा त्याच्या नावाला वादविवाद कधी चिकटत नाहीत. त्याच्यावर कधी तोंड उघडण्याची वेळ येत नाही. तो जे बोलतो ते त्याच्या बॅटनेच. तो जेव्हा बॅटिंगला उतरतो आणि तुफान फटकेबाजी करतो तेव्हा माझा काय किंवा प्रत्येकाचाच मूड पालटतो.

कम ऑन सचिन--प्रवीण अमरे
सचिन, विनोद आणि मी असे आचरेकर सरांचे तीन चेले वानखेडे स्टेडियमवर १९९३ मध्ये इंग्लंडविरूध्द कसोटीत खेळत होतो आणि सर पॅव्हेलियनमधून ही मॅच बघत होते! त्यांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता... शारदाश्रमचे आम्ही तिघेजण एकाचवेळी भारतीय संघातून खेळत होतो अन विशेष म्हणजे आमच्या तिघांचाही भारताच्या विजयात मोठा वाटा होता. या कसोटी मालिकेत भारताने ग्रॅहम गूचच्या इंग्लंडला ३-० असा व्हाईटवॉश दिला. डावखुऱ्या विनोदने द्विशतक झळकावताना सचिन तसेच माझ्याबरोबर शतकी भागीदाऱ्या रचल्या. सचिनने ७८, तर मी ५७ धावा फटकावल्या होत्या. आचरेकर सर आमच्या कामगिरीवर खूष होते. क्रिकेटमधील सचिनच्या दोन दशकांच्या कारकिदीर्चा फ्लॅशबॅक पाहताना मला प्रकर्षाने सरांची आठवण आली.
शिवाजी पार्कमध्ये खेळणारा छोटा सचिन मला आठवतोय. थकवा तर त्याला जाणवत नाही असंच वाटायचं. दहाव्या वर्षापासून मी त्याला सरांच्या नेटसवर बघितलंय; पण सदैव क्रिकेटचाच विचार करणारा हा माणूस आहे. सरांच्या दूरदशीर्पणाचंही कौतुक वाटतं. सचिनरूपी हिऱ्याला त्यांनी पैलू पाडले आणि हाच सचिन क्रिकेटजगतातील भारताचा कोहिनूर बनला!
ऑस्ट्रेलियाच्या १९९१-९२ च्या दौऱ्यात पर्थ कसोटीतील सचिनचे संस्मरणीय शतक बघायला मिळालं हे माझं भाग्य! वॅकाच्या तेज खेळपट्टीवर माईक व्हिटनीच्या माऱ्यावर भारतीय संघ गडगडत असताना सचिननेनेटाने किल्ला लढवत शतक झळकावले! दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे बाद होणारा तो पहिला फलंदाज होता सचिन पोर्ट एलिझाबेथच्या मॅचमध्ये चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. पंच रूडी कोएत्झर यांनी रूममध्ये येऊन त्याची माफी मागितली.सचिनचा रूमपार्टनर बनण्याचं भाग्य मला लाभलं.
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला तो १९९२ मध्ये. ईडन गार्डन्सवर पहिली वनडे आणि माझं पदार्पण. सचिनच्या साथीने डॉनल्ड, स्नेल, मॅकमिलन यांना सामोरे जात आम्ही अर्धशतकी भागीदारी रचली आणि भारताने सामना जिंकला तेव्हा मला अतिशय आनंद झाला. वनडेतील माझं पदार्पण विजयाने झाले आणि त्यात सचिनची साथ हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण! मंुबईने बंगालला हरवून वानखेडेवर रणजी करंडक पटकावला तेव्हा सचिनही संघात होता आणि मी मंुबईचा प्रशिक्षक होतो हा आणखी एक अविस्मरणीय क्षण!

त्याचा जन्म क्रिकेटसाठी झाला...रमाकांत आचरेकर
सचिनच्या आंतरराष्ट्रीय कारकीदीर्ला बघता बघता वीस वर्षे झाली, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही... अजूनही तो शाळकरी सचिन मला आठवतो! कुरळ्या केसाचा, कमी उंचीचा. लाजराबुजरा! त्याचा मोठा भाऊ अजित त्याला माझ्याकडे घेऊन आला, तेव्हा एक क्रिकेटप्रेमी पालक आपल्या पाल्याला घेऊन आलाय, असं मला वाटलं। पण, पठ्ठ्याने हातात बॅट घेतल्यानंतर मी चक्रावूनच गेलो... क्रिकेटची देवदत्त देणगी घेऊनच तो जन्माला आलाय, असे स्पष्टपणे दिसले. त्याचा स्टान्स, बॅट पकडण्याची शैली, फ्रंटफूट, बॅकफूटवरचा सफाईदार वापर आणि सर्वात विशेष म्हणजे गोलंदाजांवर हुकुमत गाजवण्याची ताकद.
मला दुसरा अर्जुन सापडला होता : सचिन रमेश तेंडुलकर! कारण माझ्याकडे त्यावेळी आणखी एक अर्जुन होता. विनोद गणपत कांबळी!! विनोदची बॅटिंग भन्नाट होती... त्यालाही देवाने दोन्ही हाताने भरभरून दिले होते. विनोद सचिनपेक्षा खूप मोठा होईल, असे मला त्यावेळी वाटत होते. या डावखुऱ्या फलंदाजाची नजाकत, त्याची आक्रमकता भारी. सचिनपेक्षा एक पाऊल तो पुढे असायचा. पण... नंतर सचिन खूप मोठा मोठा होत असताना विनोदला ती गती राखता आली नाही. एका एकाचा नशिब असतं.
सचिनला बाद करण्यासाठी मी स्टम्पवर नेहमी एक रूपयांचं नाणं ठेवायचो. त्याचा बोल्ड काढणाऱ्याला गोलंदाजाला ते नाणं बक्षीस! पण, सराव संपेपर्यंत बोल्ड काढण्याची करामत कुठल्याच गोलंदाजाला करता यायची नाही आणि नाणं सचिन घेऊन जायचा. अशी असंख्य नाणी त्याच्याकडे जमा झाली असतील... आणि मुख्य म्हणजे आजही त्याने ती जपून ठेवलीत. त्याची सरावाची भूक कधी संपायचीच नाही. एकदा बॅट घेतली की तो तासनतास सराव करत राहायचा. शेवटी आम्हीच कंटाळायचो. त्याच्यातील गुणवत्ता पाहून मी त्याला एका दिवशी दोन, चार सामन्यात खेळवायचो. स्कुटरवर पाठीमागे त्याला बसवला की स्वारी खुश! मग त्याला आधीच्या मैदानावरील कामगिरीपेक्षा सरस खेळ करण्याचा उत्साह यायचा...
वांद्याहून शिवाजी पार्कला सराव व पुन्हा शाळा अशी छोट्या सचिनची धावपळ पाहून अजितला त्याची शाळा बदलण्यास सांगितली. मी शारदाश्रममध्ये असल्याने तो या शाळेत आला असता तर शाळेलाही आणि मला त्याच्यावर आणखी लक्ष करण्यास पुरेसा वेळ मिळाला असता... त्यांच्या घरच्यांनी मला छान प्रतिसाद दिला. शिवाजी पार्कला काकांकडे राहायला आल्यानंतर तर तो क्रिकेटमय होऊन गेला... शाळेनंतर कीर्ती कॉलेजचाही मीच प्रशिक्षक असल्याने आमचं गुरू-शिष्याचं नातं आणखी गहिरं होत गेलं.
उण्यापुऱ्या पाच सहा वर्षात मला त्याचा लळा लागला. परदेश दौऱ्यावर जाताना तो माझा आशीर्वाद घ्यायला घरी येतो तेव्हा त्याचे जमिनीवर असलेले पाय पाहून मी थक्क होतो... एवढा मोठा माणूस होऊनही तो इतका नम्र कसा? असा प्रश्न मात्र मला पडत नाही. कारण ते तेंडुलकर घराण्याच्या संस्कारात आहे. म्हणूनच २० वर्षांनंतरही तो नवनवी शिखरे गाठत जातो तेव्हा मला फारसं आश्चर्य वाटत नाही. सचिन तू आणखी बरीच वर्षे खेळत राहा... माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे.

गॉडस् गिफ्ट!--शरद पवार
देव आपल्याला दिसत नाही... पण, त्याची अदृष्य शक्ती जाणवते! सामान्यांच्या दुनियेत जन्म घेऊन त्यांच्या दु:खावर हळुवार फुंकर घालावी, अशी प्रार्थना आभाळातल्या देवाकडे करत असतानाच दैवी सूर उमटले...
ते होते गानकोकिळा लता मंगेशकर यांचे...
त्यानंतर देवाच्या काठीचा आवाज ऐकायला आला... तो होता
मास्टर सुनील गावस्कर यांच्या खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हचा! आणि मग साक्षात देवच दिसला॥सचिनच्या रूपात!!
एका साध्या मध्यमवगीर्य कुटुंबात जन्मलेल्या या देवाची पाऊले कृष्णाच्या लिलेसारखी होती... नटखट आणि अवखळ! सचिन जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याच्यातील अद्भुत शक्तीचा साक्षात्कार होऊ लागला। त्याच्या खेळावर जीव ओवाळून टाकणारे करोडो चाहते आज जगभर पसरलेत. या साऱ्यांचा श्वासच सचिन आहे... गेल्या वीस वर्षांपासून!
विश्वातल्या मान्यवर खेळाडूंचे सारे विक्रम मोडून सचिन जगातला सवोर्त्कृष्ठ फलंदाज ठरला. क्रिकेटच्या दुनियेत त्याने नुकतेच गाठलेले यशाचे शिखर खरोखरच अलौकिक आहे. तमाम भारतीयांची मान गर्वाने उंच व्हावी अशा या लक्षणीय यशाला सलाम करताना सचिनचे अभिनंदन कसे करावे, त्यासाठी नेमके शब्द चटकन सुचत नाहीत. खरंतर मी स्वत: परमेश्वर मानत नाही, तरीही या क्षणी असे म्हणावेसे वाटते की तमाम भारतीयांसाठी सचिन 'गॉडस् गिफ्ट' ठरला आहे!
अर्थात त्याने हे यश मिळवले, ते कोणाच्या मेहेरबानीने नव्हे। लहानपणापासून अत्यंत कष्टाने मैदानावर जी मेहेनत त्याने केली, केवळ क्रिकेटवर सातत्याने लक्ष केंदीत केले, त्यामुळेच हा महान विक्रम तो करू शकला. मुंबई क्रिकेट क्लबचा अध्यक्ष या नात्याने सचिनची अनेक वैशिष्ट्ये जवळून पाहिली. त्यातले सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे पाय आजही जमिनीवर आहेत! अफाट लोकप्रियता, जागतिक प्रतिष्ठा आणि क्रिकेटचे अनेक सन्मान मिळवल्यानंतरही यशाचा अहंकार त्याला कधी शिवला नाही. वांदे-कुर्ला परिसरात क्रिकेटचे एक नवे स्टेडियम अलिकडेच तयार झाले. सचिन मुंबईत असला की सकाळी तो या स्टेडियमवर दिसणारच. खेळाप्रमाणेच त्याची वेळही इतकी अचूक की स्टेडियमवर सचिनला पाहून सकाळी ९ वाजता आपले घड्याळ चेक करून घ्यावे. दररोज तासभरच्या सरावानंतर मोठेपणाचे सारे मान बाजूला ठेवून सचिन सामान्य मुंबईकरांप्रमाणे लहान खेळाडूंमधे मिसळतो. त्यांना मार्गदर्शन करतो. क्रिकेटवर सचिनची मन:पूर्वक भक्ती असल्याचा हा बोलका पुरावा आहे. क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष असताना प्रकर्षाने जाणवलेल्या आणखी एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. भारताबाहेर परदेशात जे सामने खेळले जायचे त्यात सचिन, राहुल दविड आणि अनिल कुंबळे हे तीन असे खेळाडू मी पाहिले की जे मैदानातल्या खेळाविषयी गंभीर असायचेच, याखेरीज त्यांच्या वर्तनात कमालीची शालिनता आणि विनम्रता जाणवायची. कोणत्याही प्रसंगाला अत्यंत सभ्यपणे सामोरे जातांना, भारतीय सुसंस्कृतपणाचे दर्शन या तिघांनी जगाला घडवले. क्रिकेटच्या माध्यमातून भारताची प्रतिष्ठा वाढवणारे हे तिघेही माझ्या मते परदेशात देशाचे एका अर्थाने राजदूतच ठरले. विक्रमाचे जे शिखर सचिनने आज काबीज केले. त्यात खेळातले सातत्य, विनम्रता यांचा अर्थातच मोठा वाटा आहे. असे गुण जगात प्रत्येक खेळाडूत नसतात

Subscribe to:
Comments (Atom)