Wednesday, November 18, 2009

ग्राऊंड्समननी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया

वानखेडेवर सचिनला भेटण्याचा अनेकदा योग आला। तो जेवढा ग्रेट खेळाडू आहे तितकाच माणूस म्हणूनही तो मोठा आहे। मैदानावरील काम करणाऱ्या माळयांपासून ते इतर कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची तो आस्थेने चौकशी करतो। प्रत्येकाशी त्याचा संवाद असतो. उत्तम पीच बनवल्यानंतर त्याच्याकडून हमखास दाद मिळते. त्यामुळे सर्वांच्या मनात त्याच्याविषयी प्रचंड आदरभाव आहे, वानखेडे स्टेडियमवर गेली २७ वषेर् ग्राऊंड्समनची जबाबदारी सांभाळणारे के। व्ही. तांबे असं सांगतात तेव्हा सचिन ग्रेट असल्याचे लक्षात येते.
प्रॅक्टीस करताना मैदानावर बॉल लागून जखमी झालेल्या माळ्याच्या मदतीसाठी धावून जाणारा... उत्तम पिच बनवल्याबद्दल पाकिटातील सर्व पैसे बनवणाऱ्यांना बक्षीस म्हणून देणारा... मैदानावरील गवत कापण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांपासून ते साफसफाई करणाऱ्यापर्यंत प्रत्येकाची आस्थेने चौकशी करणारा आणि त्यांज्या अडीअडचणीत सहकार्य करणारा... अशा अनेक प्रसंगामुळे क्रिकेट मैदानावरील कर्मचारीही सचिनचे फॅन आहेत. याचा अनुभव केवळ वानखेडे किंवा इडन गार्डन येथेच येत नाही तर क्रिकेट कारकिदीर्त तो ज्या ज्या मैदानावर खेळला तेथील प्रत्येक कर्मचारी त्याज्या प्रेमळ स्वभावाचे दाखले देताना जराही थकत नाहीत. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि सचिनचे असेच प्रेमळ नाते आहे. येथे माळीकाम करणाऱ्या गोविंद पाटील व गणू गौड यांच्यासह सर्वांची त्याचा थेट संवाद होता. दहा वर्षापूवीर् सचिनने दादोजी कोंडदेव स्टेडियमवर एका मदतनिधी सामन्यात केलेली फटक्याची आतषबाजी ठाणेकरांच्या आजही लक्षात आहे. पण त्याचबरोबर सचिन किती थोर आहे, याचा अनुभव आम्हाला मॅचनंतर लगेच आला. मॅच संपल्यानंतर मैदान आणि पिच बनवणाऱ्या सर्वांना एकत्र भेटला. अतिशय चांगले पिच बनवल्याबद्दल त्याने आम्हा सर्वांचे कौतुक केले. त्यानंतर आमच्यापैकी काहींशी तर त्याज्याशी मैत्रीचे नाते निर्माण झाले. जगातील बेस्ट बॅट्समन बनल्यानंतरही त्याच्या मैत्रीत कधी खंड पडला नाही. ठाण्यात कधी आल्यास तो स्टेडियममधील कर्मचाऱ्यांचीही आस्थेने चौकशी करतो, दादोजी कोंदडेव स्टेडियमची जबाबदारी सांभाळणाऱ्यांपैकी एक असलेले हरिश्चंद वाव्हळ सचिनच्या आठवणींमध्ये रमले होते...

एमआयजी क्लब आणि सचिन याचे नातेही अतूट आहे. सचिन एमआयजीवर आल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांचीही आस्थेने चौकशी करतो. त्याज्याकडून होणारे कौतुक सर्वांनाच बळ देऊन जाते. विक्रमाची नवी शिखरे पादक्रांत करतानाही त्याज्या स्वभावात मात्र जराही फरक पडलेला नाही, असे एमआयजीवरील ग्राऊंडसमन लालुसराम जैस्वाल सांगतात. शिवाजी पार्क, आझाद मैदान येथील कर्मचाऱ्यांपैकी अनेकजण आता निवृत्त झाले आहेत. पण सचिन आणि त्यांच्या मैत्रीच्या नात्यात जराही फरक पडलेला नाही.

Saturday, November 14, 2009

कादिरला मारलेला तो षटकार!

वयाच्या सोळाव्या वर्षी भारतीय संघात दाखल झालेल्या सचिनने पदार्पणापासूनच आपल्या कामगिरीचा आलेख चढता ठेवला आहे तो जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर! आजही प्रत्येक सामन्यात शतकी खेळीच्या प्रयत्नात असणाऱ्या सचिनची धावांची भूक आजही भागलेली नाही।भारतीय संघ १९८९ मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारतीय संघाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी माझ्याकडे होती आणि सचिनची टीममध्ये एन्ट्री झाली होती...भारतीय संघ सरावासाठी नेटस्मध्ये यायचा, त्यावेळी अवघे साडेसोळा वर्ष वय असणारा हा खेळाडू जीव ओतून खेळायचा... नेटस्मधल्या सरावात फलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणातही तो इतका रमायचा की त्याला तिथून बाहेर काढणे त्यावेळी अवघड होऊन जायचं. मॅच सुरू असताना सलील अंकोलाच्या साथीने ड्रेसिंगरुमच्या मागील बाजूस सचिन सराव करत राहायचा.
याचदरम्यान भारत-पाकिस्तान यांच्यात प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या सामन्यात सचिन होता. पाकिस्तानचा नामवंत लेगस्पिनर अब्दुल कादिर खेळत असल्यामुळे कुठल्याही नवख्या फलंदाजावर दबाव आला असता. पण, सचिन बॅटिंग करण्यासाठी मैदानात गेला आणि कादिर छोटा वाटला! कादिरच्या हातभर वळलेल्या चेंडूवर सचिनने षटकार ठोकत ड्रेसिंगरूमची काच फोडली तेव्हा सर्वांच्या तोंडाचा चंबू झाला होता... आजही माझ्या मनात ही आठवण ताजी आहे.
या दौऱ्यातील सियालकोटच्या कसोटीत सचिनला संघात घेतलं होतं. सियालकोटची विकेट जलदगती गोलंदाजाना अनुकूल अशीच तयार करण्यात आली होती. त्यामुळे पाक संघातल्या इम्रान खान, वकार युनुस, वसिम अक्रम या गोलंदाजाना त्याचा फायदा होणार हे निश्चित होते.

पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या सचिनच्या चेहऱ्यावर मात्र भीतीचा लवलेश दिसला नाही. वकारने टाकलेला पहिलाच बाऊन्सर चेंडू त्याच्या तोंडावर बसला आणि नाकातून रक्त वाहू लागले. फिजीओथेरपिस्टने उपचार केल्यानंतर सचिन पुन्हा मैदानात उतरला. वकारच्या पुढच्या तीनही चेंडूवर सचिनने चौकार लगावले. त्याचवेळी हा खेळाडू भारतीय संघाचा दमदार फलंदाज म्हणून नावारुपाला येईल, अशी माझी खात्री झाली.

२००७ मध्ये भारतीय संघ इंग्लड दौऱ्यावर गेला तेव्हा पुन्हा एकदा मॅनेजरपदाची जबाबदारी माझ्याकडे आली. त्या दौऱ्यातही सचिनने अप्रतिम कामगिरी केली मात्र तीनदा त्याला चुकीच्या पध्दतीने बाद देण्यात आल्यामुळे त्याची तीन शतके हुकली.

सीनियर खेळाडूंबद्दल सचिनच्या मनात अतीव आदर आहे. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत माझ्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गौरवसोहळ्याला तो आवर्जून हजर राहिला... हे मी कधीच विसरणार नाही.


तो कधीच 'आऊट' होणार नाही- विजया राजाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक

सचिनचा जन्म साहित्य सहवासमध्ये झाला. त्यामुळे लहानपणापासूनच आम्ही त्याला पाहतोय. गोरा, गोंडस दिसायचा तो लहानपणी. त्याचे केस कापलेले नसल्यामुळे

मानेपर्यंत रुळणारे त्याचे ते कुरळे केस आणि त्यातून दिसणारा त्याचा इवलासा चेहरा मला अजूनही आठवतो। साहित्य साहित्य सहवासच्या मैदानावर तो क्रिकेट खेळायचा तेव्हा अनेकांच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत। तसा तो व्रात्य होता. पण त्याला ओरडावसं वाटलं नाही कारण तो अतिशय सुसंस्कृत आईवडलांचा मुलगा होता. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर आणि माझी विशेष मैत्री होती. ते गेले, तेव्हा मला मोठा धक्काच बसला होता. त्यांच्या जाण्यानंतर सचिनने केलेली सेंच्युरी मला आजही आठवते.

सचिन त्याच्या व्यग्र शेड्युलमुळे जरी साहित्य सहवासपासून दूर गेला असला तरी जुने मित्र, आप्तस्वकीय यांना त्याने कधीच दूर केले नाही. रोज तो भेटत नसेलही पण त्याने सगळ्यांची ओळख ठेवली हेही काही कमी नाही. सचिन लहान असताना रमेश तेंडुलकर हातात क्रिकेटचं भलं मोठं किट घेऊन शिवाजी पार्कला त्याला घेऊन जायचे तेही अजून स्वच्छ आठवतं. तेव्हा तो कोणी मास्टर ब्लास्टर नव्हता. काचा फोडल्याने लहानपणी तसा त्याने लोकांचा ओरडाही खाल्ला आहे. पण एकंदरच आईवडिलांनी त्याच्यावर जे संस्कार केले त्याला तोड नाही. मुख्य म्हणजे त्या तिनही भावांना अजित, नितीन आणि सचिन या तिघांनाही एकमेकांचं फार कौतुक आहे.

सचिनच्या पाठीशी आधी वडील खंबीरपणे उभे होते आणि मग त्याचे भाऊ. त्या सगळ्यांनी मिळून त्याचं क्रिकेट जपलं. आज एवढा मोठा झाल्यावरही त्याचे पाय क्रिकेटच्या पीचवर घट्ट रोवलेले आहेत. तो कधी शिष्ट झाला नाही, साधाच राहिला आणि त्याची बायकोही तितकीच साधी आहे. साहित्य सहवासचा तर तो आवडता होताच. तो दुसरीकडे राहायला गेला तरी अजूनही तो आम्हाला आमचाच सचिन वाटतो. मी फारसं क्रिकेट पाहत नाही. पण सचिन खेळत असला की मात्र पाहते. त्याच्या खेळाचं कधीकधी मलाच दडपण येतं. कारण मला त्याला आऊट होताना पाहायचं नसतं. आज त्याच्याभोवती असलेल्या वलयामुळे त्याला खाजगी आयुष्य राहिलेलं नाही. पण तरीही त्याने जी माणसं जपली आहेत. जी नाती जपली आहेत, ते पाहिलं की अभिमान वाटतो. साहित्य सहवासशी असलेले अनुबंध त्याने अजूनही जपून ठेवले आहेत. पक्की मुल्यं, उत्तम संस्कार, निर्मळ मन आणि शुद्ध चारित्र्य असलेला सचिन कधीच 'आउट' होणार नाही.



त्याचा खेळ म्हणजे जणू तप...संदीप खरे

प्रचंड एकाग्रता, कोणताही दबाव झुगारून समर्थपणाने खेळण्याची प्रवृत्ती आणि प्रत्येक अॅक्शन काटेकोर ही सचिनच्या खेळाची वैशिष्ट्ये मला विशेष भाव

तात. सचिनची शतके, अर्धशतके, त्याच्या अविस्मरणीय खेळी, यापेक्षा त्याची प्रत्येक अॅक्शन बघणे म्हणजे पर्वणीच असते. त्याच्या प्रत्येक बॉलला सामोरे जाण्यात असलेला काटेकोरपणा मला विलक्षण भावतो. कोणत्याही रेकॉर्ड, प्रसिद्धीसाठी न खेळता तो खेळाला झोकून देत खेळतो. यामुळेच त्याचा प्रत्येक खेळ माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. सचिनचा खेळ म्हणजे एक तप आहे. समाधी आहे.

जन्मभर एखाद्या गायकाने रियाझ केल्यानंतर त्याला परिपूर्णता लाभते. सचिनने मात्र एवढ्या लहान वयात मिळवलेली ही परिपूर्णता खरोखर थक्क करणारी आहे. कधी कधी स्वत:च्याच विक्रमांचे, कामगिरीचे दडपण येण्याची शक्यता असते. सचिन मात्र हे सगळे दबाव विसरून आजही लाजवाब खेळ करत आहे. एक कवी म्हणून त्याला भेटण्याची, त्याच्यासमोर कार्यक्रम करण्याची इच्छा न बाळगता एक निस्सीम चाहता म्हणून मला त्याला फक्त बघायचंय. मी त्याच्यावर केलेल्या कवितेला त्याने मनापासून दाद दिली असून त्याने ती मला पाठवायला सांगितली आहे, याचेच समाधान आहे.

ठ्ठ संदीप खरे, कवी

आता युक्तीचा खेळ हवा... - विठ्ठल कामत

ऑडिर्नरी ते एक्ट्रा ऑडिर्नरी माणसाने कसे बनावे हे सचिनने दाखवून दिले आहे। सर्वसामान्य कुटुंबात जन्मल्यावर माणसावर विशिष्ट प्रदेशाचा किंवा
बसतो. म्हणजे लोक त्याला त्या भागापुरता मानू लागतात. सचिनने या सगळ्या मार्यादा, चौकटी मोडून टाकल्या आणि आज सचिन संपूर्ण देशाचा बनला आहे. ऑकिर्डमध्ये गेली सात वषेर् भारताची क्रिकेट टिम उतरत होती। तेव्हा सचिनची आणि माझी वारंवार भेट होत असे. पण इतकी वषेर् होऊनही सचिनच्या वागणूकीत अजिबात फरक पडलेला नाही. कारण सचिन स्वत:च्या कामगिरीला महत्त्व देतो. त्यामुळे त्याचे डोळे, कान सतत उघडे असतात. त्यामुळेच त्याचे स्वत:ची मानसिक, शारीरिक प्रगती केली. वाट्याला आलेल्या अपशब्दांचा त्याने कधीच बाऊ केला नाही. कारण त्याचे दोन्ही पाय जमिनीवर आहे. तो प्रत्येक बॉलवर सिक्स मारत नाही तर तशा बॉलची वाट पाहातो हे जास्त महत्त्वाचे. मी इतकेच म्हणणे ही प्लेज टू द मेरिट ऑफ द बॉल अॅण्ड ही क्रिएट मेरिट प्रॉम हिज बॅट. त्याच्या आजवरच्या कारकिदीर्कडे नजर टाकली तर मला वाटते तो सर्व टिमचे प्रेशर घेऊ शकत नाही. हा अनुभव त्याला कॅप्टन केल्यावर आला पण नम्रपणे त्याने कॅप्टनशीप नाकारली. पण सचिन काळानुरुप बदलत मात्र राहिला. याचे कारण त्याच्यावरचे अस्सल मराठमोळे संस्कार. त्याच्या आई वडिलांबरोबरच त्याचा मोठा भाऊ अजितचा याचा मोठा वाटा आहे.

भारताचा सर्वात स्टाईलिश बॅट्समन मला गंुडप्पा विश्वनाथ वाटतो. कारण तो बॉलला दिशा द्यायचा. उलट सचिनबद्दल मी म्हणणे तो बॉलला गती देतो. २० वषेर् क्रिकेट खेळल्यानंतर माणसाची ताकद कमी होणे स्वाभाविक असते. त्यामुळे आता त्याने ताकदीचा विचार न करता युक्तीचा विचार करणे गरजेचे वाटते. त्याचा खेळ तसा बदलूही लागला आहे. सचिन असाच युक्तीने खेळत राहो अशा माझ्या त्याला शुभेच्छा.





परिपूर्ण कलाकार---बिग B

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कारकीदीर्ला यंदा २० वर्षं पूर्ण होत आहेत. एखाद्या खेळाडूने इतक्या सातत्याने कारकिदीर्ची वीस वर्षं गाजवणं, हा च

मत्कार म्हणावा लागेल. सचिनच्या असंख्य चाहत्यांमध्ये लता मंगेशकर, सोनू निगम, आमीर खान हेदेखील आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे बॉलीवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन... 'सात हिंदुस्तानी' पासून 'पा' पर्यंत गेली चाळीस वर्षं अनेक संकटांचा सामना करत बॉलिवूडमध्ये अढळपदाला पोहोचलेल्या 'बिग बी' चा सचिनही मोठा फॅन! सचिनच्या कारकीदीर्च्या विसाव्या वर्षानिमित्त अमिताभने दिलेली ही खास मुलाखत...

...............

* सचिन तेंडुलकर आता त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीदीर्ची २० वर्षं पूर्ण करतोय. तुम्ही या २० वर्षांकडे कसे बघता?

: अविश्वसनीय! एखाद्या खेळाडूची कारकीर्द इतकी प्रदीर्घ आणि यशस्वी असणे हा चमत्कारच म्हणायला हवा. त्याची आताची इनिंग (ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७५) ही तर त्याच्याबरोबर खेळणाऱ्या पंचविशीच्या तरुणालाही लाजवेल अशी होती. तो खरंच महान आहे.

* लिटल वंडर सचिन स्वत: एक आयकॉन आहे. पण तो तुमचाही मोठा फॅन आहे. इतकी महान व्यक्ती तुमची फॅन आहे, ही भावना कशी आहे?

: खरं सांगायचं तर हा माझा गौरव आहे, की सचिनसारखा माणूस माझा फॅन आहे. त्याचं माझ्यावर इतकं प्रेम आहे याबद्दलच मी स्वत:ला भाग्यवान समजतो.

* सचिनच्या बॅटिंगमधल्या कोणत्या गोष्टीचं तुम्हाला कौतुक वाटतं?

: सचिन जेव्हा स्टान्स घेतो, तेव्हा त्याच्या देहबोलीतूनच आत्मविश्वास दिसून येतो. समोरचा गोलंदाज कोणीही असो, ज्या बेडरपणे तो गोलंदाजाचा चेंडू सीमापार पाठवतोे, त्याला तोड नाही. त्याचे सगळे फटके म्हणजे एक वेगवान कविता असते, पण मला स्वत:ला त्याचा पंच्ड ऑफ ड्राइव्ह खूप आवडतो.

* तुम्ही स्वत: चालतीबोलती दंतकथा आहात आणि इतकी वर्ष प्रसिद्धीच्या झोतात आहात. इतकी वर्षं सचिनने मैदानावर आणि बाहेरही ज्याप्रकारे ताण हाताळला, त्याकडे तुम्ही कसं बघता?

: पहिली गोष्ट, मी महान नाही. पण सचिन एक परिपूर्ण कलाकार आहे आणि अशा सगळ्या कलाकारांना असे ताण हाताळायची दैवी देणगी असते. माझा असा विश्वास आहे की, असे ताणतणाव असल्याखेरीज कलाकार त्यांची उत्कृष्ट कलाकृती घडवू शकत नाहीत. सततचा ताणच त्याला नवनवे विक्रम करण्याची प्रेरणा देत असावा.

* अमितजी, तुम्ही कधी सचिनच्या बॅटिंगसाठी शूटिंगला उशीर केलाय किंवा एखादी ठरलेली भेट पुढे ढकलली आहे?

: हो, खूपदा...

* सचिन रंगात असतो त्यावेळी कोट्यवधी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. अचानक मॅच बघणारे लोक रिलॅक्स असतात. असं म्हणतात, की बँकेचा कॅशियरसुद्धा त्याची फलंदाजी पाहताना खुशीत येऊन पैसे देतो. तुमच्या शूटिंगदरम्यान असा फिल गुड फॅक्टर कधी जाणवला का?

: सचिन खेळत असताना एक सकारात्मक वातावरण असतं आणि शूटिंगदरम्यान तर नुसती धमाल सुरू असते. त्याच्या प्रत्येक फटक्याला जोरदार दाद दिली जाते.

* सचिनच्या काही इनिंग्ज ज्या तुम्हाला अजूनही लक्षात आहेत...

: छे, छे! त्याचा रेकॉर्ड तपासून बघा ना. त्याच्या इनिंग्जपैकी एखादी चांगली, असं कोणी निवडू शकेल का? आणि माझ्यासाठी म्हणाल, तर त्याची प्रत्येक इनिंग्ज तितकीच संस्मरणीय आहे.

* तुम्हाला आठवतं का, सचिन आणि तुमची पहिली भेट कधी आणि कशी झाली होती? आणि त्याच्याबद्दल तुमचं पहिलं मत काय होतं?

: आमची पहिली भेट कधी झाली ते मला आता आठवत नाही, पण इतकं मात्र नक्की, की पहिल्या भेटीप्रमाणेच आजही तो तसाच आणि तेवढाच नम्र आणि काहीसा लाजराबुजराच आहे. अनेकदा त्याला लोकांपुढे यायचं नसतं.

* सचिन एकदा कौन बनेगा करोडपतीमध्ये आला होता. त्याशिवाय तुम्ही दोघांनी एकत्र जाहिरातीही केल्या आहेत. कॅमेऱ्यासमोर तुमच्याबरोबर वावरताना सचिनचा वावर कसा होता?

: आमच्या दोघांचे सूर लगेचच जुळले. त्याने हातात घेतलेली कामं खूप चांगल्या प्रकारे पार पाडली होती.

* प्रसिद्ध व्यक्तींचे आयुष्य बऱ्याचदा वादात अडकलेली असतात. पण सचिन इतक्या वर्षांच्या कारकीदीर्त वादांपासून दूरच राहिला. याबद्दल तुम्हाला कधी आश्चर्य नाही वाटलं?

तो लोकांसमोर आणि खाजगी आयुष्यातही खूप साधेपणाने वागतो. या साधेपणामुळेच तो आज या स्थानावर पोहोचला आहे. वादांपासून अलिप्त राहणं तितकंसं सोपं नसतं. त्यासाठी प्रचंड मानसिक तयारी लागते. २० वर्षांच्या कारकीदीर्त सचिनला ते खूपच छान जमलंय. मला वाटतं, तो नेहमी संयमाने वागतो आणि तोंडाने उत्तर देण्याऐवजी त्याची बॅटच जास्त चांगली आणि स्पष्ट बोलते. आणि ती एकदा बोलली की मग चूक-बरोबर, वादाचे मुद्दे सगळं क्षुल्लक वाटतं.

* फलंदाज किंवा एक खेळाडू वगळता सचिनमधील इतर कोणते गुण तुम्हाला जास्त भावतात?

: त्याची सभ्य वर्तणूक आणि पुढे पुढे न करण्याचा स्वभाव.

* तुमच्याशिवाय तुमच्या कुटुंबातील आणखी कोण सचिनचे चाहते आहेत?

: आमच्या घरातील सगळेच सचिनचे खूप मोठे चाहते आहेत.

* तुमच्या आणि सचिनच्याही बाबतीत वय म्हणजे फक्त एक आकडा ठरतो. तुमच्या कामगिरीवर वयाचा परिणाम दिसत नाही. मग निवृत्तीचा विचारही...

: छे छे! निदान इथे तरी माझी आणि सचिनची तुलना करू नका. तो कदाचित त्याच्या फटकेबाज इनिंग्जमधून आपल्या बरोबर असेल किंवा नसेलही. आमीर खान एकदा म्हणाला होता, की लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना ते सवोर्त्तम आहेत हे माहीत असूनही लोकांनी त्यांना स्वत:ला तसं म्हणताना कधी ऐकलं नाही. ज्यांना लोक सवोर्त्तम म्हणतात त्यांना आतून ठाऊक असतं की अजूनही आपल्या क्षमतेइतकं आपण काही केलंच नाही. सचिन तसाच आहे. आणि म्हणूनच तो मास्टर आहे.

माझ्या घरात सचिन राहतो...--अभिनव बिंद्रा

मी अन् क्रिकेटचा चाहता? छे अजिबातच नाही... कसं शक्य आहे ते? या खेळातील माझं कुतूहल फक्त सचिन तेंडुलकर पुरतंच मर्यादित आहे. इतर कुठल्याही भारतीय फलंदाजाचा खेळ मी पाहिलेला नाही. सचिन बाद झाला की मी टीव्ही बंद करतोे. माझ्यासाठी सामनाच संपलेला असतो. यामुळेच मी सच्चा क्रिकेटप्रेमी आहे, असे म्हणता येणार नाही. क्रिकेट आवडत नाही; पण तरीही सचिनला आदर्श मानतो, अशी व्यक्ती आढळणे कठीणच. त्या थोड्याथोडक्या व्यक्तींमधील मी एक.

१९९६च्या र्वल्ड कपपासून मी क्रिकेट पहायला लागलो किंबहुना सचिनला पहायला लागलो असे म्हटले तरी चालेल. त्याचा जोश, आक्रमकता, गुण पाहून भारावून गेलो होतो. आजही सामन्यागणिक त्याच्या खेळात सुधारणा होतेय, ही बाब विलक्षण. त्याच्या प्रत्येक फटक्यात एक आगळी नजाकत असते. क्रिकेटप्रेमी, चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे सतत त्याच्या खांद्यावर असते; पण हे दडपण जुगारून झकास खेळणे त्याला छान जमते.

अलीकडेच सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७५ धावांची शानदार खेळी केली. त्याची शारजातील वादळी खेळी तर अफलातूनच; पण मला त्याची विंडिजविरुद्धची ४४ धावांची खेळी (त्रिनिदाद १९९७) अधिक आवडते. अॅब्रोज, वॉल्श व बिशप यांचा मारा परतवून लावत या पठ्ठ्याने डोळ्याचे पारणे फेडले होते. खेळपट्टी गोलंदाजांसाठी नंदनवन ठरत होती, ढगाळ वातारणात भारताचे इतर फलंदाज अपेशी ठरत होते. सचिन मात्र खेळपट्टीवर ठाण मांडून उभा होता.

असं वाटतं त्याच्या भोवती एक सुरक्षाकवच आहे, जे संकटांपासून त्याचं रक्षण करतंय. अन्यथा इतकी वषेर् न अडखळता खेळणे कठीणच! सचिनच्या या यशस्वी वाटेवर दुखापतींच्या रुपाने संकटं आली खरी, पण बेडरपणे सचिन त्यांना सामोरा गेला. त्याची धावांची भूकही कमी झालेली नाही. १९९८ च्या क्वालालंपूर राष्ट्रकुल स्पधेर्दरम्यान सचिन व माझी प्रथमच भेट झाली! त्यावेळी मी अवघा १३ वर्षांचा होतो. तेव्हा छायाचित्रकाराने माझा व सचिनचा एकत्र फोटो काढला. गंमत सांगू तो फोटो त्या छायात्रिकाराकडून मिळवण्यासाठी मी जीवाचा आटापीटा केला होता. आजही घरातील भिंतीवर तो फोटो कायम आहे. त्याच्यासह यापुढेही अशाच भेटीगाठी होत राहो, अशी इच्छा त्यावेळी मी देवापुढे व्यक्त केली होती. तब्बल अकरा वर्षांनी म्हणजे गेल्याच सोमवारी माझी ही इच्छा पूर्ण झाली. एका कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. सचिनशी औपचारिक गप्पा झाल्या. 'तू ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवलंस त्या शेवटच्या गनशॉटबद्दल मला जाणून घ्यायचंय', अशी विचारपूस त्याने केली अन् गप्पा रंगत गेल्या. एक सांगू... त्या भेटीत मी पुन्हा एकदा त्याचा चाहता झालो!